हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammad Shami-Haseen Jahan : मोहम्मद शमी गेल्या काही वर्षांपासून त्याच्या खाजगी आयुष्याने चर्चेत आहे. शमी त्याच्या घटस्फोटामुळे खूप वेळा चर्चेत येत असतो. दरम्यान, टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने आपला निर्णयात म्हटले आहे की, “मोहम्मद शमीला त्याची माजी पत्नी हसीन जहाँला दरमहा ४ लाख रुपये पोटगी द्यावी लागेल.” न्यायालयाचा निर्णय शमीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, तो हसीन जहाँला १.५ लाख रुपये आणि त्याची मुलगी इरा शमीच्या खर्चासाठी २.५ लाख रुपये देणार आहे. याशिवाय गेल्या वर्षीची पोटगी देखील त्याला द्यावी लागेल, जी एकूण ३.३६ कोटी रुपये असणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मोहम्मद शमीच्या अडचणी चांगल्याच वाढल्याच्या दिसत आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की शमी आणि हसीन जहाँ गेल्या काही वर्षांपासून वेगळे-वेगळे राहत आहेत. त्याच वेळी, शमीच्या मुलीचा ताबा अजून देखील त्याच्या माजी पत्नीकडेच आहे.
मंगळवारी न्यायालयाकडून शमीच्या माजी पत्नीच्या बाजूने हा निर्णय देण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हसीन जहाँने याला न्यायाचा विजय झाल्याचे म्हटलेया आहे. याशिवाय, ती म्हटली आहे की, ही खोटेपणा आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईची फक्त सुरुवात आहे. ती तिच्या आणि तिच्या मुलीच्या हक्कांसाठी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमी अमरोहामध्ये जाऊन त्याच्या मुलीला भेटला होता. यादरम्यान शमी त्याच्या मुलीला भेटण्यासाठी कोलकाताला पोहोचला होता. त्यावेळी हसीन जहाँ म्हटली होती की हा केवळ एक दिखावा आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : भारतीय संघात होणार मोठी उलथापालथ? एजबॅस्टन कसोटीत कुणाला लागणार लॉटरी, पहा संभाव्य playing XI
२०१४ मध्ये क्रिकेटर शमी आणि मॉडेल हसीन जहाँ यांच्यात विवाह झाला होता. त्यानंतर एका वर्षानंतर २०१५ मध्ये पत्नीने मुलगी आयरा (बेबो) ला जन्म दिला. काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाली. त्यानंतर २०१८ मध्ये दोघेही उघडपणे एकमेकांविरुद्ध समोरासमोर आले. त्यावेळी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंग, घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळासारखे गंभीर आरोप देखील केले होते.