फोटो सौजन्य: Instagram
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४ मधील भारताचा विजय होऊन काही दिवस होत नाही तोच भारत झिम्बावे टी२० मालिका भारतीय संघाने ४-१ च्या विजयासह आपल्या नावावर केली आहे. भारत-झिम्बावे टी२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताचा ४२ धावांनी विजय झाला असून संजू सॅमसनची खेळी निर्णायक ठरली.
या अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी आला. परंतु भारताच्या सलामीवीरांना अशी काही खास कामगिरी बजावता आली नाही. यशस्वी जयस्वाल, कॅप्टन शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा याना जास्त धावा घेता आल्या नाही, ज्याचा परिणाम इंडियाच्या स्कॉरबोर्डवर झाला. तीनही सलामीवीर बाद झाल्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 40 अशी झाली.
आणि संजू सॅमसन मैदानात आला. आल्या आल्या त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तसेच १२व्या षटकात संजूने ११० मीटरचा गगनचुंबी षटकार मारून सर्वांचं चकित केले. संजूने ४५ चेंडूत ५८ धाव काढल्या ज्यामुळे भारताला १६७ धावांचा टारगेट देता आला. या सामन्यात रियन पराग तसेच शिवम दुबेने सुद्धा चांगली कामगिरी केली.
या विजयात भारतीय गोलंदाजांनी सुद्धा कमाल केली असून मुकेश कुमार याने ४ विकेट्स घेतले आहे. तर दुसरीकडे तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे या गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. याच मजबूत गोलंदाजीमुळे झिम्बावेच्या फलंदाजांना १२५ धावांवरच समाधान मानावे लागले.