Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ZIM : ‘आमच्यावर नाही, भारतावरच दबाव…’ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला धूळ चारणाऱ्या झिम्बाब्वेने सूर्याआर्मीविरुद्ध फोडली डरकाळी

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर ८ सामने आजपासून सुरू होणार आहेत. या दरम्यान भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी एक विधान मोठे विधान केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 03:16 PM
IND VS ZIM: 'The pressure is not on us, it is on India...' Zimbabwe, who beat Australia and Sri Lanka, unleashed a scare against the Surya Army

IND VS ZIM: 'The pressure is not on us, it is on India...' Zimbabwe, who beat Australia and Sri Lanka, unleashed a scare against the Surya Army

Follow Us
Close
Follow Us:

IND VS ZIM, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील साखळी सामने २० फेब्रुवारी रोजी संपले. आता या स्पर्धेतील सुपर ८ सामन्यांचा थरार सुरू होणार आहे. सुपर ८ मधील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत झिम्बाब्वे संघाने आपल्या विस्मयकारक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या झिम्बाब्वेने ग्रुप स्टेज सामन्यांत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारून एकच खळबळ उडवून दिली आहे. या ऐतिहासिक यशानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून त्यांनी आता भारतीय संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी मोठे विधान केले आहे.

हेही वाचा : Aus vs Oman : झेवियर बार्टलेटचा ओमानविरुद्ध रचला इतिहास! टी२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाज

झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी ‘सुपर-८’ फेरीतील भारतासोबतच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इब्राहिम म्हणाले की, गुणतालिका आणि इतर मापदंडांनुसार आम्हाला ‘अंडरडॉग’ मानले जात असेल, तर त्यात आम्हाला काहीच अडचण नाही. उलट, या बिरुदामुळे संघ अधिक सहजतेने खेळू शकतो. या विश्वचषकाच्या सुरुवातीलाही आम्ही आमच्या गटात ‘अंडरडॉग’ म्हणूनच उतरलो होतो आणि आम्हाला तशाच स्थितीत खेळायला आवडते.

‘अंडरडॉग’ असल्याचा फायदा

झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केले की, मोठ्या संघांविरुद्ध (आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६) खेळताना त्यांच्यावर कोणतेही दडपण नसते. आमचा कर्णधार सिकंदर रझानेही काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता की, ‘अंडरडॉग’ असण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे आम्ही कोणत्याही दबावाशिवाय मैदानात उतरतो. सर्व दबाव भारतीय संघावर असेल, कारण ते त्यांच्या घरच्या मैदानावर आणि परिचयाच्या परिस्थितीत खेळत आहेत. भारत हा या फॉरमॅटमध्ये सातत्याने सुधारणा करणारा प्रबळ संघ आहे.

हेही वाचा : कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

संघ लयीत असताना रोखणे कठीण

झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम पुढे म्हणाले की, आमच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान हे असेल की, सामन्याच्या महत्त्वामुळे किंवा मैदानावरील प्रचंड गर्दीमुळे संधाने गडबडून जाऊ नये. विशेषतः जेव्हा भारतीय संघ लयीत असतो, तेव्हा त्यांना रोखणे कठीण असते. मात्र, आम्ही या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. नियोजनाच्या बाबतीत आम्ही सर्व योग्य पावले उचलली आहेत.

 

Web Title: Ind vs zim zimbabwe coach doyan ibrahims big statement before the match against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Sikandar Raza
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट
1

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा
2

DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral
3

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
4

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.