फोटो सौजन्य – X (Lalit Upadhyay)
Lalit Upadhyay Retirement : भारताच्या पुरुष संघाने मागील दोन ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२० आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. २०२० मध्ये भारताच्या संघाने मनदीप सिंहच्या नेतृत्वात कांस्यपदक नावावर केले होते तर २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने ब्राँझ मेडल जिंकले होते.
आता हॉकी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग असलेला ललित उपाध्याय याने आता हॉकीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांने त्याच्या सोशल मिडीयावर यासंदर्भात निवृती बातमी शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहीले आहे की, आज मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर करतो. हा एक कठीण क्षण आहे, पण प्रत्येक खेळाडूला एक ना एक दिवस या क्षणाचा सामना करावाच लागतो.
पुढे त्याने लिहीले आहे की, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान आहे. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. यासह त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेश याने निवृतीची घोषणा केली होती.
Today, I announce my retirement from international hockey.
It’s a tough moment, but one every athlete must face one day.
It has been the greatest honour and pride of my life to represent our country 🇮🇳🙏
Thank you for everything. 🙏 @HockeyIndiaLeag @TheHockeyIndia pic.twitter.com/OcryhKsYxQ— Lalit Upadhyay (@lalithockey) June 22, 2025
ललित हा टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. तो बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचाही सदस्य होता. ऑलिंपिकमध्ये खेळणारा तो वाराणसीचा चौथा हॉकी खेळाडू आहे. दोन ऑलिंपिकमध्ये खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे. ललित सेंटर फॉरवर्ड पोझिशनवरून खेळतो. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० हून अधिक गोल केले आहेत.
त्यांच्या आधी, हॉकीमध्ये ड्रिब्लिंगचा मास्टर मानला जाणारा मोहम्मद शाहिद हा दशकाहून अधिक काळ भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा भाग होता. १९८० च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही तो होता. मोहम्मद शाहिदने १९८४ च्या लॉस एंजेलिस आणि १९८८ च्या सोल ऑलिंपिकमध्येही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.