
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026
भारतीय महिला क्रिकेट संघ 18 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध खेळणार आहे. जपानविरुद्ध भारतीय संघ जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. मात्र हा सामना संध्याकाळी नव्हे तर सकाळच्या वेळेस खेळवले जाणार आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
भारतीय वेळेनुसार हा टी-२० सामना सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी १०:०० वाजता टॉस होणार आहे. हा सामना सकाळी १०:३० वाजता सुरू होऊन दुपारी साधारण १:०० वाजेपर्यंत संपेल. भारतीय महिला संघ या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, जपानविरुद्ध विजय मिळवून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे.
हा सामना टीव्हीवर थेट पाहण्यासाठी चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. जर तुम्हाला हा सामना मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर ऑनलाइन पाहायचा असेल, तर सोनी लिव हे अधिकृत ॲप आणि संकेतस्थळ वापरावे लागणार आहे. एशियन गेम्समधील महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला थेट सेमी फायनलमध्ये फेरीत स्थान मिळाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आशियातील चार प्रमुख संघांना स्पर्धेच्या थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात आहे.
सेमीफायनलमध्ये जिंकताच भारतीय महिला क्रिकेट संघाचे एशियन गेम्समधील मेडल पक्के होणार आहे. सेमीफायनलमध्ये विजय मिळवून संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. जिथे गोल्ड मेडलसाठी महामुकाबला रंगणार आहे. जर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला, तरी भारताला कांस्यपदकासाठी खेळता येणार असल्याचे समजते आहे.