आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी प्रणती नायक सज्ज! ( सौजन्य - सोशल मीडिया )
IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
प्रणती ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली एकमेव भारतीय जिम्नॅस्ट असून ती आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील महिलांच्या व्हॉल्ट आणि महिलांच्या ऑल-अराउंड प्रकारांत भाग घेणार आहे. तिची ही निवड तिच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीनंतर झाली आहे, ज्यामध्ये ताश्कंद, उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कप 2026 मध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात जिंकलेल्या रौप्यपदकाचाही समावेश आहे.
एएम/एनएस इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष – एचआर व प्रशासन, आशुतोष तेलंग म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताची एकमेव जिम्नॅस्ट म्हणून प्रणतीची झालेली निवड ही एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी आहे आणि हे तिचे सातत्य, शिस्त व दृढनिश्चय दर्शवते. ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि साहाय्य उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. आयची-नागोया येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही प्रणतीला खूप खूप शुभेच्छा देतो.”
प्रणतीने टोकियो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. 2026 मध्ये तिने ताश्कंद येथील एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये रौप्य आणि 54 व्या ऑल इंडिया रेल्वे जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले, याशिवाय तिने ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले.
2025 मध्ये तिने एशियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप आणि एफआयजी अॅपॅरेटस वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकले होते, तसेच 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले होते. गेल्या काही वर्षांत तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय एफआयजी स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.
भुवनेश्वर येथील ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर हे विशेष कोचिंग, दर्जेदार प्रशिक्षण सुविधा आणि खेळाडूंना सर्वंकष साहाय्य पुरवून उच्च-दर्जाच्या जिम्नॅस्ट्सच्या विकासाला पाठबळ देते, ज्याचा मुख्य उद्देश भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे स्पर्धा करण्यास सक्षम करणे हा आहे.
Steve Smith मोठा निर्णय घेणार? Ashes सिरीज खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणाला…






