फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे, यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाला पाकिस्तानने गोलंदाजीची आव्हान दिले आहे. भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे, यामध्ये पूजा वस्त्रकार संघाबाहेर आहे आणि सजीवन सजना हिला संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेला विश्वचषकातील सामना गमावला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघासाठी पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना महत्वाचा आहे. या सामन्याचे आयोजन यूएई म्हणजेच दुबईमध्ये करण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय टीम इंडियाला उपांत्य फेरीमध्ये टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचा संघाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अनेकांना चान्स दिले बोलायचं झालं तर त्यांचे कॅच सोडले होते. आता भारतीय महिला क्रिकेटसाठी महत्वाचा सामना असणार आहे. आज भारताच्या संघासमोर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणार आहेत, त्यामुळे संघाला कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. हा सामना भारतासाठीही महत्त्वाचा आहे कारण पाकिस्तानकडून हरल्यास उपांत्य फेरी गाठण्याच्या टीम इंडियाच्या मोहिमेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागणार आहे.
🚨 Toss and Team Update 🚨
Pakistan win the toss in Dubai, #TeamIndia will bowl first.
One change in our Playing XI for today.
Follow the match ▶️ https://t.co/eqdkvWVK4h#T20WorldCup | #INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/5MZn76NMRl
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
भारताचे पुढील आणखी दोन सामने आहेत, यामध्ये भारताच्या संघाला श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका सिंग ठाकूर.
फातिमा सना (कर्णधार), मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोझा, सिदार अमीन, नीदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तोबा हसन, नसरा संधू, अरुब शाह, सादिया इक्बाल.