Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार भारत विरुद्ध पाक हायहोल्टेज सामना; जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामानबद्दलचा सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Oct 13, 2023 | 05:58 PM
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार भारत विरुद्ध पाक हायहोल्टेज सामना; जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामानबद्दलचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:
World Cup 2023 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) महामुकाबला रंगणार आहे. विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामन्याची (IND vs PAK) सर्वांनाच प्रतिक्षा आहे. सामन्यावेळी पावसाची शक्यता नाही. त्याशिवाय तापमानही सर्वसाधारण राहील.अहमदाबाद येथे शनिवारी जास्तीत जास्त 35 डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे. कमीत कमी 21 डिग्री इतके तापमान असू शकते. त्यामुळे शनिवारी अहमदाबादमध्ये जास्त ऊन्हाची शक्यता नाही.
भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदीच होणार आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील.
मैदानावर आतापर्यंत किती सामने?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत 29 वनडे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा विजयी झाला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 206 आहे.
विश्वचषकात भारतच भारी
वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या  सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.  पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही.  2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.
वनडे विश्वचषकात भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.

Web Title: India vs pakistan match preview high altitude clash at narendra modi stadium in ahmedabad know in detail about playing fields grounds and weather report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 05:55 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Narendra Modi Stadium

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?
1

Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?

India vs Pakistan सामन्यापूर्वी शाहीद अफ्रिदीने पुन्हा भारताला डिवचलं! म्हणाला – काही लोक भारतीय असल्याचे सिद्ध…
2

India vs Pakistan सामन्यापूर्वी शाहीद अफ्रिदीने पुन्हा भारताला डिवचलं! म्हणाला – काही लोक भारतीय असल्याचे सिद्ध…

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात
4

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.