
India U19 Asia cup
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
भारतीय संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने धु्व्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून २२७ धावा केल्या. भारतासाठी ईशान सूदने ४३ धावांत ३ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. २२८ धावांचे लक्ष्य गाठताना सलामीवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडून चांगली सुरुवात करून दिली. सेहवागने ५१ धावा केल्या, तर लक्ष्य रायचंदानीचे शतक हुकले. त्याने ९० चेंडूंमध्ये १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावा केल्या.
त्यानंतर व्ही. के. विनीतने सूत्रे हाती घेतली आणि ५७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताने ३६.५ षटकांत केवळ २ विकेट्स गमावून २३० धावा केल्या. भारताने हा ८ विकेट्सने सामना जिंकला. दुसरीकडे, पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला ९ विकेट्सने पराभूत केले. यासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तान हा गतविजेता संघही आहे. त्यामुळे, अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी या दोन संघांमध्ये एक रोमांचक लढत पाहायला मिळू शकते.
अंडर-१९ आशिया कप २०२६ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर आयोजित केला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक सकाळी १०:०० वाजता होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विजेतेपदाचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. चाहते सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपवर सामन्याचा थेट आनंद घेऊ शकतात.
Ans: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.
Ans: हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक १० वाजता होईल.
Ans: सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.