फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा महिला संघ उद्यापासून म्हणजेच ४ ऑक्टोबरपासून महिला T२० विश्वचषक २०२४ च्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध रंगणार आहे. भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. हा सामना शुक्रवारी दुबईत होणार आहे. यामध्ये भारताचा संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचे दोन सराव सामने पार पडले यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबरला सामना होणार आहे. टीम इंडियाचे चाहते सर्व सामने टीव्हीवर तसेच मोबाईलवर पाहू शकतील. चाहत्यांना घरबसल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येणार आहे. महिला T२० विश्वचषक भारतात टीव्ही चॅनेल तसेच मोबाईल ॲप्सवर प्रसारित केला जाणार आहे. टीम इंडियाचे चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतील. विशेष म्हणजे हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर अनेक भाषांमध्येही कॉमेंट्री ऐकू येते. जर आपण मोबाईल ॲपबद्दल बोललो तर ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट पाहिले जाऊ शकते. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. यानंतर त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
भारताचा पहिला सामना न्यूझीलंड आणि दुसरा पाकिस्तान विरुद्ध आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ ऑक्टोबरला सामना होणार आहे. भारताचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडिया पहिले तीन सामने दुबईत खेळणार आहे. चौथा सामना शारजाह येथे होणार आहे.