फोटो सौजन्य - BCCI/officialslc
भारताचा महिला क्रिकेट संघ आज आशिया कपमधील अंतिम फेरी खेळणार आहे. यामध्ये भारताचा संघ श्रीलंकेचा सामना करणार आहे. आशिया कपमधील दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर दोन्ही संघानी अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ विरोधी संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये आले आहेत. परंतु जर आशिया कपच्या इतिहासावर नजर टाकली तर भारताचा संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या आशिया कपमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तानचा सात गडी राखून, यूएईचा ७८ धावांनी आणि नेपाळचा ८२ धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीत बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला.
भारताची सलामीवीर जोडी स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांची जोडी प्रत्येक सामन्यामध्ये कमाल करत आहे. त्याचबरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर सुद्धा दमदार फॉरमध्ये आशिया कपच्या सामन्यांमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर रिचा घोषने सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका स्वीकारली आहे.
भारतीय गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्माने दमदार कामगिरी केली आहे. दीप्तीने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक नऊ विकेट्स घेतल्या आहेत तर रेणुका सात विकेट्ससह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांचा इकॉनॉमी रेटही उत्कृष्ट आहे, याचा अर्थ त्यांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. त्याचबरोबर रेणुका सिंह आणि राधा यादव यांनी सुद्धा संघासाठी कमाल करून दाखवली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०० खेळवण्यात येणार आहे. हा सामना तुम्ही HotStar वर पाहू शकता. त्याचबरोबर टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, तनुजा कंवर, सजना सजीवन