
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ चा समारोप १९ नोव्हेंबर रोजी दोन सामन्यांसह झाला. या स्पर्धेने आता चार उपांत्य फेरीतील संघ निश्चित केले आहेत. यासह, दोन्ही उपांत्य फेरीतील सामने निश्चित झाले आहेत. भारत अ संघाचा उपांत्य सामना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता खेळला जाईल. हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारत अ संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तयारी तीव्र केली आहे.
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत अ संघाचा सामना बांगलादेश अ संघाशी होईल. युएई आणि ओमानविरुद्ध विजय मिळवून टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करत आहे, तर बांगलादेश हाँगकाँग आणि अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गट टप्प्यात भारत पाकिस्तान अ संघाकडून पराभूत झाला, तर बांगलादेश श्रीलंका अ संघाकडून पराभूत झाला.
दोन्ही संघ दमदार कामगिरीसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. भारत अ संघाने त्यांचा मागील सामना जिंकला, तर बांगलादेशने त्यांचा मागील सामना गमावला. या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्हवर होणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळले. पहिल्या सामन्यात त्यांनी यूएईचा १४८ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. लीग स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ओमानशी झाला, जिथे भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. आता त्यांचा सामना सेमीफायनलमध्ये बांगलादेश अ संघाशी होईल आणि भारतीय संघ तिथे कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल. या स्पर्धेचा अंतिम सामना २३ नोव्हेंबर रोजी दोहा येथे खेळला जाईल.
After a thrilling group stage, we have our semi-finalists! 🤩 Doha has witnessed some outstanding cricket, and we can’t wait to see how the final few days unfold 🕺#DPWorldAsiaCupRisingStars2025 #ACC pic.twitter.com/wIJWVLpcGV — AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 19, 2025
२०२५ च्या आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू पाकिस्तानचे माझ सदाकत आणि वैभव सूर्यवंशी आहेत. दोन्ही फलंदाजांनी स्पर्धेत २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. माझ सदाकतने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये २१२ धावा केल्या आहेत. वैभवने तीन सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये २०१ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत वैभवने आतापर्यंत २६२ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.