फोटो सौजन्य : England Cricket
इंग्लड संघाची प्लेइंग 11 : टीम इंडिया इंग्लंडचा काही तासात सामना करणार आहे. भारताचा संघ हा शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली खेळत तर इंग्लंडचा संघ हा बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणाऱ्या सामनामध्ये भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन काय असणार आहे यावर अजूनही बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. सामन्याला एक दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेटने इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन शेअर केली आहे. यामध्ये अनेक अनुभवी त्याचबरोबर नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
इंग्लंड संघ भारताविरुद्ध पाच जणांची कसोटी मालिका खेळणार आहे या मालिकेच्या पहिल्या सामन्याची सुरुवात ही 20 जून पासून होणार आहे. सामन्याचे एक दिवसाआधी इंग्लंडच्या संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडचा संघ हा बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून जॅक क्रॉली आणि बेन डकेट हे दोघे मैदानात उतरतील. तिसऱ्या क्रमांकावर ऑली पॉप हा असणार आहे, चौथा क्रमांकवर कसोटी क्रिकेटमधील दिग्गज जो रूट फलंदाजी करणार आहे.
Team news from Leeds ahead of a BIG week 📋
Ready to face @BCCI 👊
— England Cricket (@englandcricket) June 18, 2025
मागील कसोटी मालिकांमध्ये जो रूट याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे तो भारताविरुद्ध चांगली कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.पाचव्या क्रमांकावर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार हॅरी ब्रुक हा फलंदाजी करेल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल त्याने संघासाठी अनेकदा अष्टपैलीची चांगली भूमिका निभावली आहे.
जेम्स स्मित आणि क्रिस्ट चोकेश यांना देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. ब्रायडन कार्स, जोश टिशू हे पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहेत. शोएब बासीर याला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पॉप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, क्रिस्ट चौकेश, ब्रायडन कार्स, जोश टिंग्यू, शोएब बसिर