
फोटो सौजन्य - Bhajan Marg सोशल मिडिया
भारतीय महिला संघाने 2025 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली आहे. यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताच्या महिला संघाने विश्वचषकामध्ये ट्राॅफी जिंकल्यानंतर भारतामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्याचबरोबर देशामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आता भारताच्या संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारतीय महिला खेळाडू या प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.
प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संघाची अष्टपैलू स्नेह राणा हिने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले. ती या विश्वचषकामध्ये लीग सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती पण तिला सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळी स्नेह राणा हिने प्रेमानंद महाराज यांना काही प्रश्न विचारले आणि यावेळी महाराजांनी तिला काही आयुष्याचे मार्ग सांगितले.
त्याचबरोबर स्नेह राणा हिला नाम जाप करण्यासाठी सांगितले आहे. त्याचबरोबर स्नेह राणा हिच्यासोबत यास्तिका भाटीया हि देखील प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्याचबरोबर काही महिला खेळाडू या प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रेमानंद महाराज यांनी त्यांना काही सकारात्मक विचार सांगितले. सध्या या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Indian Women Cricket Team की खिलाड़ियों ने महाराज जी से क्या प्रश्न किए ? Bhajan Marg pic.twitter.com/7jlkPEknW4 — Bhajan Marg (@RadhaKeliKunj) March 19, 2024
२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडियासाठी उल्लेखनीय होता. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी १०४ धावांची भागीदारी केली. वर्मा यांनी ८७ धावा केल्या. स्मृती मानधना यांनीही ४५ आणि दीप्ती शर्मा यांनी ५८ धावा केल्या. टीम इंडियाने ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने १०१ धावा केल्या आणि बराच वेळ टिकून राहिली. तिला इतर कोणत्याही फलंदाजाची योग्य साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका ४५.३ षटकांतच सर्वबाद झाली आणि टीम इंडियाला ५२ धावांनी विजय मिळवून दिला. या प्रक्रियेत दीप्ती शर्मानेही ५ विकेट्स घेतल्या.