आज टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा दुसरा सामना नेदरलँड सोबत खेळत आहे. नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीची आलेला फलंदाज के एल राहुल 12 चंडूत अवघ्या 9 धावा करून पॉवर प्लेच्या तिसऱ्याच षटकात माघारी पतला. तर त्यापाठोपाठ रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का पोहोचला आहे. ३९ चेंडूत ५३ धावा करून कर्णधार रोहित शर्मा देखील झेल बाद झाला.