फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
ऑलिम्पिक दिवस दुसऱ्या संघाचे वेळापत्रक : भारताच्या संघाने ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी काही भारतीय खेळाडूच्या हाती निराशा आली तर काही भारतीय खेळाडू पुढील फेरीमध्ये पोहोचले आहेत. आज म्हणजेच २८ जुलै रोजी भारताचे दिग्गज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. यामध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू तिचा ऑलिम्पिकचमचा आज पहिला सामना खेळणार आहे. तर दिग्गज टेनिसपटू शरथ कमल सुद्धा आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर भारतीय नेमबाज मनू भाकर हिने क्वलिफिकेशन राउंडमध्ये ३ तिसरे स्थान गाठून फायनलमध्ये पोहोचली आहे. आज मनू भाकर ही पदकसाठी लढताना दिसणार आहे.
भारताने यंदा २१ नेमबाजांची तुकडी पाठवली आहे, यामधील काही नेमबाज काल २७ जुलै रोजी खेळताना दिसले तर आज काही नेमबाज त्यांचा निशाणा लावणार आहेत. त्याचबरोबर भारतीय टेनिस जोडी रोहन बोपण्णा आणि श्रीबालाजी यांच्यामध्ये कालचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही त्यामुळे तो सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता होण्याची शक्यता आहे.
खेळ | वेळ | खेळाडू |
१० मीटर रायफल शूटिंग क्वालिफिकेशन | 12:45 | रमिता जिंदल |
इलवेनिल वलारिवान | ||
बॅडमिंटन | 12:50 | पीव्ही सिंधू |
रोईंग | 13:06 | बलराज पनवर |
टेबल टेनिस महिला वैयक्तिक स्पर्धा | 14:15 | श्रिजा अकुला |
स्विमिंग पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक | 14:30 | श्रीहरी नटराजन |
स्विमिंग महिला २०० मीटर फ्रीस्टाईल | 14:30 | धिनिधी देशिंगू |
शूटिंग १० मीटर एअर रायफल | 14:45 | संदीप सिंह |
अर्जुन बबुता | ||
टेबल टेनिस पुरुष वैयक्तिक स्पर्धा | 15:00 | शरथ कमल |
महिला शूटिंग १० मीटर एअर पिस्तूल फायनल | 15:30 | मनू भाकर |
टेनिस | 15:30 | सुमित नागल |
बॉक्सिंग | 15:50 | निखत झरीन |
टेबल टेनिस महिला वैयक्तिक स्पर्धा | 16:30 | मनिका बत्रा |
तिरंदाजी महिला संघ क्वार्टर फायनल | 17:45 | दीपिका कुमारी |
अंकिता भकत | ||
भजन कौर | ||
तिरंदाजी महिला संघ सेमी फायनल | 19:17 | क्वार्टर फायनल विजेता |
बॅडमिंटन | 20:00 | एचएस प्रणॉय |
तिरंदाजी महिला संघ ब्राँझ मेडल मॅच | 20:18 | सेमी फायनल पराभूत संघ |
तिरंदाजी महिला संघ गोल्ड मेडल मॅच | 20:41 | सेमी फायनल विजेते संघ |