पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारताचे 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. शूटिंगमध्ये भारताच्या तीन नेमबाजांनी तीन पदक मिळवली आहेत, तर दुसऱ्या कोणत्याही खेळांमध्ये अजूनपर्यंत एकही पदक आलेले नाही. यामध्ये आर्चरीमधील खराब कामगिरीमुळे भारतीय महिला आणि पुरुष संघाला प्रभावाचा सामना करावा लागला तर वैयक्तिक आर्चरी स्पर्धेमध्ये सुद्धा अजूनपर्यंत एकही पदक हाती लागले नाही. १ ऑगस्ट रोजी भारतीय बॅडमिंटनपटूंचे तीन सामने पार पडले यामध्ये दोन सामन्यांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना पराभवाचा सामना करावा लागला, त्याचबरोबर त्यांचा पॅरिसचा प्रवास सुद्धा संपला आहे.
भारतीय स्टार जोडी सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा मलेशियाच्या जोडीने पराभव करून पॅरिसमधील प्रवास संपवला आहे. त्याचबरोबर भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारी पीव्हीसिंधू सुद्धा पॅरिसमधून राऊंड ऑफ 16 च्या सामन्यांमध्ये चीन विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभूत झाली आहे.
भारताच्या दोन महिला शूटर्स क्वालिफिकेशनच्या राउंडमध्ये फायनल मध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरल्या आणि भारताची बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर १ वर असणारी चीनच्या बॉक्सरकडून पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष हॉकी संघाचा सुद्धा बेल्जियम विरुद्ध १-२ असा पराभव झाला आहे. बराच खेळांमध्ये भारतीयांच्या हाती एक ऑगस्ट रोजी निराशा आली. रेस वॉकमध्ये सुद्धा भारताचे ऍथलेटिक्स फार चांगली कामगिरी करू शकले नाही.
Define a Rollercoaster day for Indian Olympics
Answer = 1st August 2024 at #Paris2024
🫣 pic.twitter.com/9I7IQIdkDH— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 1, 2024
भारतीय स्टार शूटर स्वप्निल खुशालने भारताला ऑलम्पिकमधील शूटिंगचे तिसरे पदक मिळवून दिले आहे. त्याने 50 मीटर रायफल मध्ये पहिले पदक मिळवून दिले. फायनलमध्ये खिचडीवर असताना स्वप्निलने दुसऱ्या सिरीजनंतर दमदार कामगिरी करत भारतीयांना कांस्यपदकाचा आनंद मिळवून दिला.
THE ONLY REASON TO SMILE TODAY
Swapnil Kusale 🇮🇳♥️ pic.twitter.com/XNp4OjYScl
— The Khel India (@TheKhelIndia) August 1, 2024