
india wins against japan
कबड्डी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय खेळाडूंनी मैदानावर आपले पूर्ण वर्चस्व राखले. आक्रमक रेड आणि भक्कम डिफेन्स यांच्या उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर भारतीय संघाने जपानला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळे भारतीय संघाने जपानवर एकतर्फी विजय नोंदवला. भारतीय खेळाडू आपल्या पहिल्याच सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले.
जपानच्या भक्कम मानल्या जाणाऱ्या डिफेन्सला वारंवार भेदत भारतीय चढाईपटूंनी एकापाठोपाठ पॉईंट्स मिळवत गेले. जपानच्या बचावपटूंना भारतीय रेडर्सची हालचाल आणि वेग यांचा अंदाज बांधणे कठीण जात होते.केवळ आक्रमणातच नव्हे, तर बचावातही भारताचे पारडे जड राहिल्याचे दिसून आले. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखालील पकडीच्या रणनीतीने जपानच्या संघाला गुण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
India cruise to a 49-24 win over Japan in their Group A Kabaddi clash! 💪 Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026 #BaarBaarBharatHarBaarBharat https://t.co/3nMXamfB89 — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 21, 2026
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय रेडर्सनी जपानच्या डिफेन्सवर सातत्याने दडपण ठेवले. भारताची हीच रणनीती अत्यंत प्रभावी ठरली. स्टार रेडर आशू मलिकने अप्रतिम कौशल्य दाखवत ‘सुपर रेड’ केली आणि एकाच चढाईत जपानच्या तब्बल तीन खेळाडूंना आउट केले. ज्यामुळे पहिल्या हाफअखेर भारताने ३१-९ अशी भक्कम व एकतर्फी आघाडी मिळवली. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर भारताने पहिल्याच हाफमध्ये जपानच्या संपूर्ण संघाला दोन वेळा ‘ऑल-आऊट’ केले.
Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित
दुसऱ्या हाफमध्ये भारताने आपल्या राखीव बाकावरील दिग्गज खेळाडूंना संधी दिली. मैदानावर उतरताच अर्जुन देशवालने आपल्या पहिल्याच चढाईत सुरेख गुण टिपत संघाचे खाते पुढे नेले. यानंतर पवन सहरावत आणि असलम इनामदार यांनीही आपल्या चपळ हालचालींनी जपानच्या डिफेन्सवर दडपण कायम ठेवले. या तिघांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात तिसऱ्यांदा जपानला ‘ऑल-आऊट’ची नामुष्की सहन करायला लावली. यामुळे भारताची आघाडी आणखी भक्कम झाली.