Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप 

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्यामुळे त्याच्या गौरवशाली २० वर्षांच्या कारकिर्दीचा आता शेवट झाला असून तो आता टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 01, 2025 | 05:16 PM
"Goodbye... but the end.." Rohan Bopanna announces retirement; bids farewell to 20-year career with emotional post

"Goodbye... but the end.." Rohan Bopanna announces retirement; bids farewell to 20-year career with emotional post

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा स्टार रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती जाहीर 
  • २० वर्षांच्या कारकिर्दीचा झाला शेवट
  • भावनिक पोस्टमध्ये लिहिले  “अलविदा… पण शेवट नाही.”

Rohan Bopanna retires from tennis : टेनिस जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार रोहन बोपण्णा आता टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही. बोपण्णाकडून शनिवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे त्याच्या गौरवशाली २० वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे. बोपण्णाने त्याच्या कारकिर्दीत दोन ग्रँड स्लॅम जेतेपदे  नावावर केले आहेत. अनुभवी दुहेरी खेळाडू त्याचा शेवटचा पॅरिस मास्टर्स १००० मध्ये अलेक्झांडर बुब्लिकसोबत खेळला होता. त्याने एका भावनिक पोस्टमध्ये लिहिले की  “अलविदा… पण शेवट नाही.”

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाला नकार! भारतात परतताच जयस्वालच्या बॅटने ओकली आग; पाडला धावांचा पाऊस

रोहन बोपण्णाने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना त्याने लिहिले आहे की, “तुमच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टीला तुम्ही कसे निरोप देता?” तेव्हा त्याने जाहीर केले की तो “माझा रॅकेट अधिकृतपणे बंद करत आहे.” कर्नाटकातील कूर्ग येथील रहिवासी असलेल्या बोपण्णाने पुढे लिहिले की, “भारतातील कूर्ग या छोट्या शहरात माझा प्रवास सुरू करण्यापासून, माझी सर्व्हिस सुधारण्यासाठी लाकडाचे तुकडे तोडण्यापासून, कॉफीच्या बागेत धावण्यापासून ते स्टॅमिना वाढवण्यासाठी, जगातील सर्वात मोठ्या कोर्टवर फ्लडलाइट्सखाली माझे स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत. हे सर्व स्वप्नासारखे वाटत आहे.”

बोपण्णाकडून २०२३ मध्ये डेव्हिस कपला निरोप 

पॅरिस ऑलिंपिकनंतर बोपण्णाने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली. २०२३ मध्ये त्याने डेव्हिस कपमधून देखील निवृत्ती घेतली. त्याने शेवटचा सामना लखनौमध्ये मोरोक्कोविरुद्ध खेळला होता. त्याने २०१७ मध्ये गॅब्रिएला डाब्रोव्स्कीसोबत त्याचे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. २०२३ मध्ये, बोपण्णाने एब्डेनसोबत इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स १००० जिंकले आणि ४३ व्या वर्षी मास्टर्स १००० जेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. गेल्या वर्षी, या जोडीने पुढे मियामी ओपनवर देखील नाव कोरले आणि सर्वात वयस्कर मास्टर्स १००० चॅम्पियन म्हणून स्वतःचा विक्रमात भर घातली.

❤️❤️❤️ pic.twitter.com/IS3scPrwhW — Rohan Bopanna (@rohanbopanna) November 1, 2025

हेही वाचा : ICC World Cup Final 2025 : विजेता संघ होणार मालमाल! मिळणार विक्रमी बक्षिसे; उपविजेत्या संघाचीही लागणार लॉटरी

२०१६ च्या रिओ गेम्समध्ये रोहन बोपण्णा ऑलिंपिक पदक जिंकण्याच्या फार जवळ जाऊन पोहचला होता. मिश्र दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झासोबत भागीदारी करून, त्यांनी कांस्यपदकाच्या सामन्यात धडक मारली होती. परंतु लुसी ह्राडेका आणि राडेक स्टेपानेक या चेक जोडीकडून या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला होता, परिणामी त्यांना चौथे स्थान पटकावे लागले होते.

Web Title: Indian tennis star rohan bopanna announces retirement from tennis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Rohan Bopanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.