अरमानप्रीत कौर आणि लॉरा वोल्वार्ड(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SA W, ICC World Cup Final 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूल चारून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले नाही तर लाखोंची कमाई देखली मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले ३३९ धावांचे विक्रमी लक्ष्य गाठून विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाला अंदाजे ₹१९.८५ कोटी (अंदाजे ₹२० कोटी) बक्षिसे दिले जाणार आहे. तथापि, खेळाडू आता अंतिम सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत. जर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर त्यांना अंदाजे ₹३९.७० कोटी इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.
या वर्षी आयसीसीकडून महिला विश्वचषकाच्या बक्षिस रकमेत ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. एकूण $१३.८८ दशलक्ष (अंदाजे ११६ कोटी रुपये) बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे, जी मागील आवृत्तीपेक्षा सुमारे २९७% इतकी जास्त आहे. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम $३.५ दशलक्ष होती. महत्त्वाचे म्हणजे, पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धेत आता समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. हा निर्णय आयसीसीच्या लिंग वेतन समानता धोरणाचा एक भाग असून ज्याचा उद्देश पुरुष आणि महिला खेळाडूंना समान आर्थिक सन्मान प्रदान करणे हा आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला $४.४८ दशलक्ष (अंदाजे ३९.७ कोटी रुपये) आणि उपविजेत्या संघाला $२.२४ दशलक्ष (अंदाजे १९.८ कोटी रुपये) मिळणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला $१.१२ दशलक्ष (अंदाजे ९.९ कोटी रुपये) देण्यात येणार आहे.
आयसीसीकडून हे देखील सुनिश्चित करण्यात आले आहे, की गट टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांनी रिकाम्या हाताने परत येऊ नये. त्यामुळे प्रत्येक सहभागी संघाला $250,000 (अंदाजे रु. 2.2 कोटी) मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, जिंकलेल्या प्रत्येक गट सामन्यासाठी $34,314 (अंदाजे रु. 28.8 लाख) बक्षीस दिले जाईल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना $700,000 (अंदाजे रु. 6.1 कोटी) आणि सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना $280,000 (अंदाजे रु. 2.4 कोटी) मिळणार आहेत.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाला नकार! भारतात परतताच जयस्वालच्या बॅटने ओकली आग; पाडला धावांचा पाऊस
या विश्वचषकाने केवळ भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली नाही तर महिला क्रिकेटच्या आर्थिक स्थितीला एक नवीन दिशा देखील प्रदान केली आहे.






