

भारतीय हॉकी टीमने रचला मोठा इतिहास
पहिल्यांदाच बनली जगातील 4 नंबरची टीम
जपानविरुद्ध मिळवला 4-0 ने विजय
Indian Hockey Team: भारतीय महिला हॉकी संघाने देशाचा गौरव वाढवला आहे. भारतीय महिला संघ FIH मधील चौथ्या नंबरचा संघ बनला आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय संघाने महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानचा 4-0 ने पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने नव्या रेकॉर्ड रचला आहे.
भारतीय हॉकी संघाने अवघ्या ४८ तासांत दमदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत ऐतिहासिक झेप घेतली आहे. सलग दोन दिवस भारतीय महिला संघाने विजय प्राप्त केले आहेत. भारताने या स्पर्धेत स्पेन आणि जर्मनी यांच्यासारख्या दिग्गज संघांना मागे टाकले आहे. पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 6-2 ने पराभव केला आहे.
तर बुधवारी झालेल्या सामन्यात महिला संघाने जपानवर 4-0 ने विजय प्राप्त केला आहे. या ऐतिहासिक यशानंतर दुसऱ्याची दिवशी भारतीय महिला संघाने जपानविरुद्ध दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यानंतर भारताने FIH मधले आपले स्थान पक्के केले आहे.
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला हॉकी संघ युवा कर्णधार सलीमा टेटे हिच्या नेतृत्वात शानदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. सर्व 5 सामने जिंकून भारताने अत्यंत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सलीमा टेटेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने संपूर्ण साखळी फेरीत चांगला खेळ केला आहे.
भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारतीय महिला संघाने पुढील लक्ष्य हे फायनलमध्ये प्रवेश करण्याचे असणार आहे. भारत 27 नोव्हेंबर रोजी मलेशियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून फायनलमध्ये जाण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. यंदाची स्पर्धा भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यास, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सलग तीन वेळा जिंकणारा भारत हा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरणार आहे.
Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, 'या' संघाला दाखवला घरचा रस्ता
भारतीय महिला हॉकी संघासाठी २०२६ हे वर्ष ऐतिहासिक आणि अत्यंत यशस्वी ठरत आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेण्यापूर्वीच टीम इंडियाने या वर्षात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. युवा कर्णधार सलीमा टेटे हिच्या नेतृत्वात संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत चाहत्यांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा किती गोलने पराभव केला?
महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा 4-0 गोलने दणदणीत पराभव केला.
FIH क्रमवारीत भारतीय महिला हॉकी संघ कोणत्या स्थानावर पोहोचला आहे?
भारतीय महिला हॉकी संघ FIH जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.