
Asian Games 2026
📸📸 from the Gold Medal match as #TeamIndia secure their biggest victory (by runs) in women’s T20Is 🙌👏 Scorecard ▶️ https://t.co/DVlhLBajxB#AsianGames pic.twitter.com/hIOUJIwf1x — BCCI Women (@BCCIWomen) September 22, 2026
आज भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात क्रिकेटचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये 216 रन्सचे भलेमोठे टार्गेट श्रीलंकेच्या संघाला दिले. एवढे मोठे आव्हान पूर्ण करताना श्रीलंकेचा संघ मोठ्या दडपणाखाली आल्याचे दिसून आले. श्रीलंकेचा संघ केवळ 69 रन्सवर ऑल आउट झाला.
भारताचा १४७ रन्सचा हा विजय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील (धावांच्या फरकानुसार) भारतीय महिला संघाचा सर्वात मोठा विजय असल्याचे दिसून येत आहे. भारतीय महिलांच्या या दमदार कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत भारताचा तिरंगा पुन्हा एकदा अभिमानाने फडकला आहे.
IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास
२१७ रन्सच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांवर प्रचंड दबाव आणला. श्रीलंकेची सलामीवीर इमेशा दुलानी १० चेंडूंत केवळ ३ धावा करून बाद झाली, तर हसिनी परेरा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने २१ चेंडूंत २९ रन्सची एकाकी झुंज देत सर्वाधिक रन्स केल्या. तिच्याव्यतिरिक्त केवळ कविशा दिलहारी 11 रन्स करू शकली.
मंधानाचे ‘७९ धावांचे’ वादळ आणि ११,००० आंतरराष्ट्रीय धावांचा अफाट विक्रम
शफाली बाद झाल्यानंतरही स्मृती मंधानाची बॅट धडाकेबाजपणे फसत राहिली. मंधानाने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये १७५.५६ च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने ७९ धावांची एक अविस्मरणीय खेळी केली, ज्यात पाच चौकार आणि सात उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या ऐतिहासिक खेळीदरम्यान, स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.
IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती