फोटो सौजन्य : X (The Khel India)
Taiwan Athletics Open 2025 : तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 सुरू आहे, काल म्हणजेच ८ जून रोजी या स्पर्धेचा पहिला दिवस पार पडला होता. या स्पर्धेमध्ये भारताचे अनेक नामवंत खेळाडू सामील झाले आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या ॲथलेटिक्सने पहिल्या दिनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताच्या कोणत्या अथलेटिक्सने कोणत्या खेळांमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारताची स्टार धावपटू ज्योती याराजी हिने तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 मध्यये कमालीची कामगिरी केली. तिने तिच्या पहिल्याच इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक नावावर केले आहे. ज्योती याराजी हिने महिला 100 मी हर्डल यांच्यामध्ये 12.99 सेकंदात पार करुन गोल्ड मेडल नावावर केले आहे. भारतीय युवा खेळाडू तेजस याने पुरुष 100 मी हर्डल यांच्यामध्ये 13.52 सेकंदात पार करुन गोल्ड मेडल जिंकले आहे. भारताच्या पुरुष धावपटु संघाने देखील काल्च्या दिनी कमालीची कामगिरी केली होती.
IND vs ENG : भारताच्या संघाला इंग्लंड लायन्सने 348 धावांवर रोखलं! जाणुन घ्या सामन्याचा अहवाल
तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 स्पर्धेच्या पहिल्या दिनी भारताचा धावपटु संघाने दिनाचे तिसरे मेडल नावावर केले आहे. त्यांनी पुरुषांची 4×100 मीटर रिले या स्पर्धेमध्ये त्यांनी 37.75 सेकंदात हे अंतर पार करुन सुवर्ण पदक नावावर केले आहे. पुरुषांची 4×100 मीटर रिले स्पर्धेमध्ये भारताच्या गुरविंदरवीर, अनिमेश, मणिकांत आणि अमलान या अॅथलेटिक्सचा समावेश होता. त्याचबरोबर महिला संघाने देखील या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.
6/6 GOLD MEDALS FOR TEAM INDIA TODAY 💪
– Although the competition is pretty less at Taiwan Athletics Open, Winning Gold Medals in all the all Final events is huge achievement too!
8 more Final matches will take place Tomorrow!
WELL DONE, TEAM INDIA 🇮🇳❤️ pic.twitter.com/hcqDWhK0vn
— The Khel India (@TheKhelIndia) June 7, 2025
भारतीय महिला संघ सुधीक्षा, अभिनया राजराजन, स्नेहा एसएस आणि नित्या गंधे यांच्या संघाने पहिल्याच दिनी कमालीची कामगिरी केली. त्यांनी महिला 4×100 मीटर रिले या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले. भारतीय धावपटू पुजा हिने देखील कालच्या शर्यतीमध्ये गोल्ड मेडल नावावर केले आहे. मागील आठवड्यामध्ये आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 1500 मीटर शर्यतीत रौप्य आणि 800 मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकणारी पुजाने सुवर्ण पदक नावावर केले.
उंच उडीपटु अब्दुल्ला अबूबकरने याने देखील भारताला गोल्ड मेडल मिळवुन दिले आहे. त्याने तिसऱ्या प्रयत्नात १६.२१ मीटरची उडी मारुन सुवर्ण पदक जिंकले.