
फोटो सौजन्य - JioHotstar
Aman Rao scored a double century : विजय हजारे ट्रॉफीचे सामने सध्या सुरू आहेत. सोशल मिडियावर सध्या अनेक खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये देशांतर्गत सामन्यामधील कामगिरी पाहून लिलावामध्ये पैशांचा पाऊस पाडला होता. लवकरच आयपीएलचा नवा सिझन येणार आहे यामध्ये अनेक नवे युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. २१ वर्षीय फलंदाजाने २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला.
हैदराबादच्या अमन रावने डावाची सुरुवात केली आणि शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि २०० धावा केल्या. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच्या काही महिन्यांत त्याचा चांगला फॉर्म राजस्थान रॉयल्ससाठी फायदेशीर ठरेल. अमन रावच्या कामगिरीमुळे हैदराबादने ३५२ धावांचा मोठा टप्पा गाठला. त्याने त्याच्या डावात एकूण २५ चौकार मारले.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद आणि बंगाल यांच्यात सामना सुरू आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि अमन रावने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. अमनला राहुल सिंग गेहलोत आणि कर्णधार तिलक वर्मा यांची चांगली साथ मिळाली. दोघांना बाद केल्यानंतर त्याने प्रज्ञय रेड्डीसोबत भागीदारी केली. अमन रावने एका टोकापासून धावा काढत शेवटपर्यंत धावा करत राहिला.
तो १५३ चेंडूत १९४ धावांवर फलंदाजी करत होता. डावाच्या शेवटच्या चेंडूवर, अमनने आकाश दीपच्या गोलंदाजीवर एक जबरदस्त षटकार मारून त्याचे द्विशतक पूर्ण केले. त्याने १५४ चेंडूत २०० धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता. यामुळे हैदराबादने ५० षटकांत ५ गडी गमावून ३५२ धावा केल्या.
– Batting on 194*(153)
– 1 ball left.
– Akash Deep bowling. AMAN RAO SMASHED AN ICONIC SIX TO COMPLETE THE DOUBLE HUNDRED 🥶 This is just his 3rd List A match for the 21-year-old, A future star from Hyderabad. pic.twitter.com/49DVownHQA — Johns. (@CricCrazyJohns) January 6, 2026
आयपीएल २०२६ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने हैदराबादच्या अमन रावला ३० लाख रुपयांना त्यांच्या संघात सामील केले. त्यावेळी अमनबद्दल फारसे माहिती नव्हते. आता, या २१ वर्षीय खेळाडूने त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे. द्विशतक झळकावून, अमनने त्याची प्रतिभा सिद्ध केली आहे. राजस्थान रॉयल्सला आशा आहे की तो आयपीएल २०२६ मध्येही ही कामगिरी सुरू ठेवेल आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत राहील.