Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind w vs Eng w : भारताच्या मानधना-रावल या सलामी जोडीने रचला इतिहास! इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ पराक्रम

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात 3 एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या सामन्यात भारताची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 17, 2025 | 06:37 PM
Ind w vs Eng w: India's opening pair Mandhana-Rawal created history! They did 'this' feat in the ODI against England

Ind w vs Eng w: India's opening pair Mandhana-Rawal created history! They did 'this' feat in the ODI against England

Follow Us
Close
Follow Us:

Ind w vs Eng w : भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० मध्ये इंग्लंडला धूळ चारल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेतही तोच कित्ता गिरवायला सुरवात केली आहे. इंग्लड आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना साउथहॅम्प्टन येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या विजयाने भारतीय संघाची एकदिवसीय मालिकेची सुरुवात चांगली झाली आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासोबतच टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. ही कामगिरी टीम इंडियाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी करून दाखवली आहे.

हेही वाचा : IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क

मानधना आणि प्रतिका रावल ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडियाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी संघाला इंग्लंडविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला पहिला धक्का स्मृती मानधनाच्या स्वरूपात मिळाला. मानधना २८ धावा करून बाद झाली. यासह, टीम इंडियाच्या सलामी जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने १००० धावा पूर्ण करून जगातील पहिली सलामीवीर जोडी बनली आहे.

स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या दोघांनीही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८४.६ च्या सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रतिका रावलने ३६ धावा काढल्या. यापूर्वी महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी इंग्लंडच्या कॅरोलिन अ‍ॅटकिन्स आणि सारा टेलर या जोडीच्या नावावर होती.

दीप्ती शर्मा सामनावीर ठरली

टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिने ६४ चेंडूंत ६२ धावा केल्या. दीप्ती शर्माला तिच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे, दीप्ती शर्मा या सामन्यात चेंडूने आपली कमाल दाखवू शकली नाही. तिने १० षटकांत ५८ धावा दिल्या. या दरम्यान तिला एकही विकेट काढता आली नाही. त्यांच्याशिवाय जेमिमाने ४८, प्रतिका रावलने ३६, मानधना २८, हरलीन देओलने २७ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने १७ धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने ४८.२ ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून हा सामना आपल्या नावावर केल्या.

हेही वाचा : Sir Jadeja कडून ICC Ranking मध्ये पहिले स्थान हिसकावणं म्हणजेच…! हा पराक्रम करणारा जगातील चौथा अष्टपैलू

इंग्लंड संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट गमावून २५८ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सोफिया डंकलीने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिडसन रिचर्ड्सने ५३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने ४१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. परंतु इंग्लड आपल्या धावांचा बचाव करू शकले नाहीत.

 

Web Title: Indias opening pair of mandhana rawal created history they did this feat against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज
1

Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज

नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral
2

नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral

ICC Women World Cup: एकदिवसीय विश्वचषक विजयाचा परिणाम! भारतीय महिलां खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये भरघोस वाढ
3

ICC Women World Cup: एकदिवसीय विश्वचषक विजयाचा परिणाम! भारतीय महिलां खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये भरघोस वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.