फोटो सौजन्य – X (BCCI)
भारताच्या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना त्याच्या कामगिरीमुळे ओळखले जाते. 36 वर्षाचा रविंद्र जडेजा हा आताही त्याच जोशाने आणि त्याच मेहनतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. फिल्डिंगमध्ये तर त्याचकडे चेंडू गेला तर दुसरा रन घेण्यासाठी फलंदाज चारवेळा विचार करतो. 20 वर्षाच्या खेळाडूसारखा फिल्डिंग त्याचबरोबर गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करतो. त्याच्या वयाहून कमी असलेल्या अनेक खेळाडूंनी कधीच निवृती देखील घेतली आहे.
लाॅर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला पण त्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले आहे त्याचबरोबर तो जगातील पहिल्या क्रमांकाचा का अष्टपैलु आहे हे देखील साध्य केले. आंतरराष्ट्रिय क्रिकेट बोर्डने आता आयसीसी रॅंकिंग जाहीर केली आहे यामध्ये भारताचा स्टार सर जडेजा हा पहिला क्रमांक सोडण्याचे नाव घेत नाही. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमध्ये फारच गुणांचा फरक आहे. रविंद्र जडेजाचे सध्या क्रमवारीमध्ये 409 रेटींग आहे तर मेंहदी हसन मिराज याच्याकडे 305 पाॅंइट आहेत.
Noteworthy performers from the #ENGvIND and #WIvAUS Tests soar in the latest ICC Men’s Player Rankings 👏
More ➡️ https://t.co/W2lRQdbmWS pic.twitter.com/RZXW1qlqA2
— ICC (@ICC) July 16, 2025
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडीयाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १७० धावांवर कोसळला. एकेकाळी भारताचा दुसरा डाव १०० धावांच्या आसपास कोसळत असल्याचे दिसत होते, परंतु अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रचंड संयम आणि धाडस दाखवले. त्याने १८१ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. पहिल्या डावात त्याने १३१ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. लॉर्ड्स कसोटीत शानदार फलंदाजी करून ३६ वर्षीय जडेजाने एक मोठा विक्रम रचला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० पेक्षा जास्त धावा आणि ६०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जडेजा हा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर सध्या ७०१८ धावा आणि ६११ विकेट्स आहेत. जडेजाने ८३ कसोटी, २०४ एकदिवसीय आणि ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ३६९७, २८०६ आणि ५१५ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ३२६, एकदिवसीय सामन्यात २३१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५४ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले.
जडेजा व्यतिरिक्त, कपिल देव, शॉन पोलॉक आणि शाकिब अल हसन यांनी सात हजारांहून अधिक धावा आणि ६०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९०३१ धावा आणि ६८७ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा माजी महान अष्टपैलू पोलॉकने ७३८६ धावा आणि ८२९ विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा धडाकेबाज अष्टपैलू शाकिबने १४७३० धावा आणि ७१२ विकेट्स घेतल्या.