अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi) आता वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. काल फ्रान्स विरुद्ध फिफा विश्वचषक 2022 फायनलमध्ये, अर्जेंटिनाने फ्रान्सवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. फिफा विश्वकप जिंकल्यानंतर त्यांचे फॅन्सना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर जाणून घेऊया लिओनेल मेस्सीच्या आयुष्याबद्दस काही गोष्टी.
[read_also content=”लिओनेल मेस्सी वापरतो 24 कॅरेट सोन्याचा फोन! किंमत ऐकून चक्रावून जाल https://www.navarashtra.com/sports/lionel-messi-uses-24-carat-gold-phone-you-will-be-shocked-to-hear-the-price-354809.html”]
विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनेल मेस्सी आपल्या कुटुंबासह आनंद साजरा करत आहे. फ्रान्स विरुद्धचा सामना जिकंल्यानंतर मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो आणि त्यांची तीन मुले मैदानात उपस्थित होती. विश्वचषक संपल्यानंतर पुरस्कार सोहळा झाला तेव्हा लिओनेल मेस्सीचे संपूर्ण कुटुंब मैदानावर पोहोचले. येथे मेस्सीने फोटो काढले आणि संपूर्ण कुटुंबासह विश्वचषक ट्रॉफीचा आनंद साजरा केला.
मेस्सी आणि अँटोनेला यांची प्रेमकहाणी खूप खास आहे, कारण दोघेही लहानपणापासून मित्र आहेत. दोघांची पहिली भेट वयाच्या 5 व्या वर्षी झाली होती. ज्या ठिकाणी मेस्सीने आपले बालपण अर्जेंटिनातील रोझारियो येथे घालवले, त्याच ठिकाणी त्याची अँटोनेलाशी भेट झाली. त्यानंतर लिओनेल मेस्सी नेवेलच्या ओल्ड बॉईज क्लबकडून खेळताना मित्राच्या घरी जेवायला गेला होता. त्या वेळी, तो त्याच्या संघातील मिडफिल्डरच्या चुलत बहीणी म्हणजेच अँटोनेला रोकुझो तो भेटला. दरम्यान, मेस्सीने वयाच्या 11 व्या वर्षी अर्जेंटिना सोडले आणि बार्सिलोनामध्ये स्थलांतरित झाले.
लिओनेल मेस्सी बार्सिलोनामध्ये शिफ्ट झाल्यावर अँटोनेलासोबतची संपर्कात नव्हता. 2004 पर्यंत दोघे एकमेकांपासून दूर राहिले, पण त्यानंतर एक अपघात झाला ज्यामुळे ते पुन्हा जवळ आले. अँटोनेला रोकुझोचा सर्वात जवळचा मित्र कार अपघातात मरण पावला होता, त्यानंतर मेस्सीने तिला साथ देत तिचं सांत्वन केलं आणि या क्षणापासून ते दोघं जवळ आले, त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं. 2009 मध्ये, लिओनेल मेस्सी आणि अँटोनेला रोकुझो यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. लिओनेल मेस्सी आणि अँटोनेला रोकुझो यांना 2012 मध्ये दोघांना पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर पाच वर्षांनी 2017 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले.
लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो एक मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. 2016 मध्ये तिने रिकी सरकनीसोबत मॉडेलिंग करार केला. 2017 मध्ये त्यांनी आपली बुटीक चेन सुरू केली. अँटोनेला रोकुझो जवळपास प्रत्येक सामन्यात लिओनेल मेस्सीला सपोर्ट करताना दिसत आहे. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकादरम्यानही अँटोनेला रोकुझो अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्यात उपस्थित होती.