मोहाली : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 38 वा लीग सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात पंजाबमधील IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाईल. या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी गाठ असेल. याआधी झालेल्या सामन्यात पंजाब संघाने 2 गडी राखून विजय मिळवला होता.
त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा (MI) त्यांच्या घरच्या मैदानावर शानदार पराभव केला होता. कर्णधार सॅम करणची फलंदाजीतील चमकदार कामगिरी पंजाबसाठी गेल्या सामन्यात पाहायला मिळाली, तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले. सध्या पंजाबचा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे, ज्यात त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2023
आपण लखनऊ सुपर जायंट्स संघाबद्दल बोललो, तर हा हंगाम त्यांच्यासाठी चांगला म्हणता येणार नाही. लखनऊच्या संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरातविरुद्ध 7 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता, ज्यामध्ये ते एका वेळी अगदी सहज सामना जिंकताना दिसले होते. 7 सामन्यांत 4 विजय मिळवून संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
खेळपट्टीचा अहवाल
पंजाब आणि लखनऊ यांच्यातील हा सामना मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल. येथील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत झालेल्या ५९ आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३३ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २६ वेळा सामना जिंकला आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६६ धावांच्या जवळ आहे.
पंजाब किंग्जचा संभाव्य संघ : 1 शिखर धवन (कर्णधार), 2 प्रभसिमरन सिंग, 3 लियाम लिव्हिंगस्टोन, 4 हरप्रीत सिंग, 5 जितेश शर्मा (विकेटकीपर), 6 सॅम कुरान, 7 शाहरुख खान, 8 हरप्रीत ब्रार, 9 कागिसो रबाडा, 10 राहुल चहर, 11 अर्शदीप सिंग
लखनऊ सुपर जायंट्सचा संभाव्य संघ : 1 केएल राहुल (कर्णधार), 2 काइल मेयर्स, 3 दीपक हुडा, 4 कृणाल पंड्या, 5 निकोलस पूरन (विकेटकीपर), 6 आयुष बडोनी, 7 मार्कस स्टोइनिस, 8 नवीन उल हक, 9 रवी बिश्नोई, 10 अमित मिश्रा, 11 आवेश खान