Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs LSG सामन्यात उत्कंठावर्धक शेवटच्या षटकात एका कँचने विजयाची माळ लखनऊच्या गळ्यात

काल आयपीएलमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या रोमहर्षक षटकात सामना फिरला आणि लखनऊ जायंट्सचा विजय झाला. राजस्थान रॉयलला शेवटच्या षटकात ३ चेंडूत १४ धावा हव्या असताना, ध्रुव जुरेल खेळत होता. ध्रुव जुरेल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने मारलेल्या उत्तुंग फटक्याचा सीमारेषेवर दीपक हुडाने झेल पकडून सामना फिरवला.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 20, 2023 | 02:59 PM
RR Vs LSG सामन्यात उत्कंठावर्धक शेवटच्या षटकात एका कँचने विजयाची माळ लखनऊच्या गळ्यात
Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल या दोन संघात लढत झाली. या हंगामातीलही २५वी लढत होती, प्रत्येक लढतीत क्रिकेट चाहत्यांना एकापेक्षा एक दमदार मॅच पहायला मिळाल्या आहेत. लीगमध्ये आतापर्यंत अनेक अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. काल झालेल्या लढतदेखील अशीच चुरशीची झाली.

राजस्थानची सुरुवात चांगली

राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना लखनऊने १५४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. सलामीच्या जोडीने ८७ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर राजस्थानने एका पाठोपाठ एक विकेट गमावल्या आणि मॅचदेखील गमावली. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १९ धावांची गरज होती.

शेवटच्या षटकाने उत्कंठा वाढवली

केएल राहुलने १९ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी जलद गोलंदाज आवेश खानकडे सोपवली. रियान परागने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर १ धावा घेतली. पण तिसऱ्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल मैदानात आला. राजस्थानला ३ चेंडूत १४ धावांची गरज होती. ध्रुव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे अशात राजस्थानचे पारडे जड वाटत होते.

दीपक हुडाने अफलातून झेल पकडल्या सामना फिरला

आवेशच्या चौथ्या चेंडूवर जुरेलने मिट विकेट आणि मिड ऑनच्या मधून हवेत चेंडू मारला. हा शॉट म्हणजे षटकार असे सर्वांना वाटले. मात्र तेथे उभा असलेल्या दीपक हुड्डाने अफलातून कॅच घेतला. दीपक सीमा रेषेच्या अगदी जवळ उभा होता. त्याने हवेत उडी उडी घेत अचूकपणे कॅच घेतला. कॅच पकडताना त्याचा पाय सीमा रेषेला लागण्याची शक्यता होती. पण दीपकने अतिशय सावधपणे चेंडू पकडला. दीपकच्या या कॅचने लखनौला १० धावांने विजय मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

लखनऊची प्रथम फलंदाजी 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊने २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. काइल मेयर्सने ५१, कर्णधार राहुलने ३९ तर निकोलस पूरनने २९ धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने २० षटकात ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. काइल मेयर्सने ५१, कर्णधार राहुलने ३९ तर निकोलस पूरनने २९ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून यशस्वीने ३५ चेंडूत ४४ तर जोस बटलरने ४१ चेंडूत ४० धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही.

Web Title: Ipl 2023 rr vs lsg match in last thrilling over with one catch in lucknow victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 02:58 PM

Topics:  

  • Lucknow Super Giants
  • RR vs LSG

संबंधित बातम्या

GT vs LSG : एक दोन वेळा नाही तर तीन वेळा तोंडावर पडला गोलंदाज! दोनदा टळला मोठा अपघात
1

GT vs LSG : एक दोन वेळा नाही तर तीन वेळा तोंडावर पडला गोलंदाज! दोनदा टळला मोठा अपघात

IPL 2025 : गूगलच्या सीईओलाही सकाळी उठायला भाग पाडले, Vaibhav Suryavanshi साठी सुंदर पिचाईची खास पोस्ट चर्चेत.. 
2

IPL 2025 : गूगलच्या सीईओलाही सकाळी उठायला भाग पाडले, Vaibhav Suryavanshi साठी सुंदर पिचाईची खास पोस्ट चर्चेत.. 

RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू.. 
3

RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू.. 

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यकच..! आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान
4

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यकच..! आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.