RCB vs RR eliminator match will start shortly; Will RCB's Vijayarath stop Rajasthan, see live updates
IPL 2024 RR vs RCB Live Score : IPL 2024 मधील एलिमिनेटर सामन्यात RRचा सामना RCB शी होत आहे. या दोन्ही संघांमध्ये एक संघ सलग 6 सामने जिंकले आहेत, तर दुसरा सलग 4 सामने हरला. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने-सामने आहेत. तब्बल नऊ वर्षांनी दोन्ही संघ एलिमिनेटर सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. या एलिमिनेटर सामन्यात ज्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल त्याचा आयपीएल २०२४ मधील प्रवास संपुष्टात येईल. त्याचबरोबर विजयी संघाला क्वालिफाय-२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.
Chennai Calling ✈️
Congratulations to 𝗥𝗮𝗷𝗮𝘀𝘁𝗵𝗮𝗻 𝗥𝗼𝘆𝗮𝗹𝘀 🥳🩷
They are set to face Sunrisers Hyderabad in an electrifying #Qualifier2 🤜🤛
Scorecard ▶️ https://t.co/b5YGTn7pOL #TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall | @rajasthanroyals pic.twitter.com/V8dLUL0hSS
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Chennai Calling ✈️
Congratulations to 𝗥𝗮𝗷𝗮𝘀𝘁𝗵𝗮𝗻 𝗥𝗼𝘆𝗮𝗹𝘀 🥳🩷
They are set to face Sunrisers Hyderabad in an electrifying #Qualifier2 🤜🤛
Scorecard ▶️ https://t.co/b5YGTn7pOL #TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall | @rajasthanroyals pic.twitter.com/V8dLUL0hSS
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
बंगळुरूचे जबरदस्त कमबॅक
बंगळुरूने आपल्या शेवटच्या 6 पैकी 6 सामने चांगल्या धावगतीने जिंकून हा चमत्कार केला. आता त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे, ज्यांनी या मोसमात जबरदस्त सुरुवात केली होती. पण, शेवटच्या दिशेने त्याने आपली लय गमावली. RR ला त्याचे शेवटचे 5 सामने जिंकण्यात अपयश आले आहे. त्यांना 5 पैकी 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर 1 सामना पावसामुळे रद्द गेला आहे. मात्र, प्लेऑफचे दडपण वेगळे असते. जो संघ दबाव योग्य प्रकारे हाताळेल तो एलिमिनेटर सामना जिंकण्यात यशस्वी होईल.
दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती
अशा प्रकारे दोन्ही संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ स्वरुपाचा आहे. या सामन्यात आरसीबी सलग ६ विजयानंतर आणि राजस्थान रॉयल्स सलग ४ पराभवानंतर इथे पोहोचला आहे. या सामन्यात विराट-सॅमसनसह अनेक खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष आहे.
RR vs RCB Live IPL 2024 Eliminator
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एलिमिनेटर सामन्यात नऊ वर्षांनी पुन्हा आले आहेत. याआधी दोन्ही संघांनी २०१५ साली एलिमिनेटर सामना खेळवला होता. त्यावेळी हा सामना एकतर्फी झाला होता. ज्यामध्ये आरसीबीने बाजी मारली होती. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०९ धावा करून सर्वबाद झाला होता.
नऊ वर्षांनी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-बंगळुरु आमने-सामने
RCB संघ सलग ६ सामने जिंकून प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या ५ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात आपली विजयाची मालिका कायम राखायची आहे. २०१५ मध्ये, जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला, तेव्हा हा सामना आरसीबीने एकतर्फी पद्धतीने जिंकला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०९ धावा करून सर्वबाद झाला होता. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.