फोटो सौजन्य : X
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : काल लखनऊला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद च्या संघाने विजय मिळवून आरसीबीच्या संघाला अडचणीत पहिल्या स्थानासाठी टाकले आहे. 42 धावांनी सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा पराभव केला. कालच्या सामनामध्ये बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने संघाचे नेतृत्व केले नाही त्याच्या जागेवर जितेश शर्मा याने संघाची कमाल सांभाळली. आता या सामन्या बद्दल मोठे अपडेट समोर आले आहे.
एकाना स्टेडियमवर खेळलेला हा सामना सनरायझर्सने ४२ धावांनी जिंकला. तथापि, या विजयाचा संघावर कोणताही परिणाम होणार नाही कारण हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुणतालिकेमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीच्या संघाला नुकसान सहन करावे लागले आहे. कालचा सामना झाल्यानंतर भारतीय नियमक मंडळाने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांच्यावर कारवाई केली आहे.
या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने रजत पाटीदार आणि पॅट कमिन्स यांना स्टाउट ओव्हर रेटमुळे दंड ठोठावला आहे. एकीकडे, आरसीबीला या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे, ज्यामुळे कर्णधार रजत पाटीदारला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर संघातील इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा हा पहिलाच नियमभंग आहे, ज्यामुळे कर्णधार पॅट कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहिता २.२२ अंतर्गत बीसीसीआयने दोन्ही कर्णधारांवर ही कारवाई केली आहे.
ENG VS IND : जसप्रीत बुमराला का कर्णधार बनवले नाही? अजित आगरकर यांनी सांगितले कारण
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून २३१ धावा केल्या. हैदराबादकडून फलंदाजी करताना इशान किशनने ४८ चेंडूत ९४ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय अभिषेक शर्माने ३४ धावा केल्या. आरसीबीकडून गोलंदाजी करताना रोमारियो शेफर्डने २ विकेट घेतल्या. यानंतर, आरसीबी संघ १९.५ षटकांत फक्त १८९ धावा करू शकला. आरसीबीकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने ३२ चेंडूत सर्वाधिक ६२ धावा केल्या. कालच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने संघाला चांगले सुरुवात करून दिली होती त्याने पंचवीस चेंडूंमध्ये 43 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी घेतले.