IPL 2025: Big blow to DC during IPL! 'This' fast bowler clearly refuses to return to India..
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव बघता आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आयपीएल आता १६ किंवा १७ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, स्पर्धा पुन्हा सुरू होण्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत दिल्लीला आता उर्वरित सामने खेळावे लागणार आहेत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कला ११.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता आणि पहिल्या क्वालिफायर आणि अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील राहील होता.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत मिशेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्सकडून १२ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. २४ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध तीन विकेट्स घेत त्याने दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले, तर ३० मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पाच विकेट्स घेत तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. आयपीएलमध्ये पाच विकेट्स घेणारा तो दिल्ली फ्रँचायझीचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
९ मे रोजी आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, त्यानंतर स्टार्क त्याची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीसह आपल्या मायदेशी परतले. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या मॅनेजरने दुजोरा दिलाआहे की, की स्टार्क भारतात परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर मिचेल स्टार्क आयपीएलमधून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे.
दिल्लीच्या मिचेल स्टार्क व्यतिरिक्त, काही इतर खेळाडू देखील आता लीगमध्ये सामील होणार नाहीत, असे अहवालांमधून समोर आले आहे. या हंगामात आणखी काही ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. आता फ्रँचायझींसोबतच्या त्यांच्या करारांवर याचा काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे. कारण ते अजून साफ झालेले नाही. स्टार्कला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळायचा आहे. जो पुढील महिन्यात खेळला जाईल.