विराट कोहली आणि अंबती रायडू(फोटो-सोशल मीडिया)
virat kohli test retirement : सद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावचे आहे. एकीकडे आता आयपीएल २०२५ देखील एक आठवडा स्थगित करण्यात आली आहे. अशातच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता विराट देखील कसोटीमधून निवृत्त होण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यानंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे, की विराट कोहलीने इंग्लंड मालिकेपूर्वी बीसीसीआयकडे निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे. विराट कोहळी निवृत्तीच्या विचारात असेल तर त्याने तसे करून नये म्हणून माजी क्रिकेटपटू अंबती रायडूने विराटला एक विनंती केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या विश्वचषकावेळी अंबाती रायुडूला संघात स्थान मिळाले नव्हते. ही गोष्ट लक्षात घेणीसारखी आहे. त्यानंतर रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूने असा दावा केला आहे की, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया पूर्वीसारखी राहू शकणार नाही. याबद्दल बोलताना रायुडूने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “विराट कोहली, कृपया निवृत्त होऊ नकोस. भारतीय संघाला तुझी पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. तुझ्याकडे अजूनही खूप काही आहे. तुझ्याशिवाय कसोटी क्रिकेट पूर्वीसारखे राहू शकणार नाही… कृपया पुन्हा विचार कर.”
बीसीसीआयकडून २२-२३ मे रोजी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोहलीच्या कसोटीतून निवृत्तीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. आशावेळी, जर कोहली सहमत न होता त्याने निवृत्ती घेतली तर दोन खेळाडू कसोटी संघात परतणार आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला कोहलीच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात येईल.
विराट कोहलीने २०११ मध्ये भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत टीम इंडियासाठी त्याने १२३ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान विराट कोहलीने ४६.८५ च्या सरासरीने सुमारे ९२३० धावा केल्या आहेत. पण आता विराटच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या बातमीने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. जर विराट कोहलीने खरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती कळे तर ती टीम इंडियासाठी वाईट बातमी ठरण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय, टीम इंडियाला परदेश दौऱ्यांवर अनुभवाची कमतरता जाणवू लागेल.