विराट कोहली(फोटो-सोशल मिडिया)
virat kohli test retirement :भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे तर आता अशीही चर्चा समोर आली आहे की, विराट कोहली देखील कसोटीला अलविदा म्हणण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या महितीनुसार, बीसीसीआयकडून २२-२३ मे रोजी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोहलीच्या कसोटीतून निवृत्तीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. आशावेळी, जर कोहली सहमत न होता त्याने निवृत्ती घेतली तर दोन खेळाडू कसोटी संघात परतणार आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला कोहलीच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात येईल.
हेही वाचा : Archery World Cup : तीरंदाजी विश्वचषकात भारताचा डंका! सात पदके जिंकून केली नेत्रदीपक कामगिरी, वाचा सविस्तर..
यापूर्वी जेव्हा कोहलीच्या निवृत्तीच्या कोणत्याच बातम्या नव्हत्या, तेव्हा श्रेयस अय्यरचे पुनरागमन कठीण मानले जात होते. परंतु, आता जर कोहलीने अचानक कसोटीतून माघार घेतली तर त्याच्या जागी अय्यरला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहवालात म्हटले आहे की श्रेयस अय्यरची निवड निश्चित नाही. तो सध्या भारत अ किंवा भारतीय संघासाठी निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये देखील नाही. पण अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र कोहलीच्या निवृत्तीनंतर निवड समिती अय्यरबद्दल नक्कीच विचार करेल अशी माहिती मिळत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शार्दुल ठाकूर टीम इंडियाचा भाग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवड समिती शार्दुलच्या पुनरागमनाचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. क्रिकबझच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. ठाकूरने १२ ऑक्टोबर २०१८ रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. लॉर्ड शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी एकूण ११ कसोटी सामने खेळले असून ३१ विकेट्स घेण्याव्यतिरिक्त त्याने ३३१ धावा देखील केल्या आहेत.
शार्दुलने डिसेंबर २०२३ मध्ये सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन घरच्या मालिका आणि पाच सामन्यांच्या मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली नाही. ज्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता.