IPL 2025: Dushmantha Chameera's tune in the air! He took a catch that fooled the cricket world, even Starc raised his eyebrows, watch the video
IPL 2025 : काल झालेल्या आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत कोलकात्याने २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्लीच्या संघाला १९० धावापर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात अद्भुत अशा क्षेत्ररक्षणाचा नजारा बघायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू दुष्मंथा चमीराने हवेत उडी मारून एक अफलातून झेल घेतला. चमीराचा हा झेल पाहिल्यानंतर स्टार्कला देखील त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की हा झेल घेतला गेला आहे. सुरुवातीला स्टार्क आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आला.
आयपीएलच्या ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने दिल्लीला पराभवाची धूळ चारली. पहिल्या डावातील २० वे षटक मिचेल स्टार्क याने टाकले. या षटकादरम्यान षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पूर्ण लांबीचा पडला. त्यानंतर आयपीएलच्या या हंगामातील आपला पहिला सामना खेळत असणाऱ्या अनुकुल रॉयने चेंडूला फ्लिक केले आणि चेंडू सीमारेषेवरून जात असताना दुष्मंथ चामीराने हवेत सूर मारत एक अफलातून झेल पकडला. अनुकुल रॉयला शून्यावर माघारी परतावे लागले.
दुष्मंथ हा डावीकडे धावत जाऊन त्याने हवेत उडी मारली. त्याने त्याची उडी अचूकपणे मारल्याळे झेल पूर्ण होऊ शकला. हा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल मनाला जात आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाजाकडून अशा प्रकारची चपळता क्वचितच बघायला मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा चमीराने झेल पकडला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर, झेल पकडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
Two moments of brilliance ✌
Andre Russell’s 1️⃣0️⃣6️⃣m six 🤩
Dushmantha Chameera’s spectacular grab 🤯Which was your favourite out of the two? ✍
Scorecard ▶ https://t.co/saNudbWINr #TATAIPL | #DCvKKR | @KKRiders | @DelhiCapitals pic.twitter.com/9griw9ji4f
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
दिल्ली कॅपिटल्सकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ९ विकेटच्या मोबदल्यात २०४ धावा उभ्या केल्या. ज्यामध्ये अंगक्रिशने ४४, रिंकू सिंगने ३६, अजिंक्य रहाणेने २६ धावा करून महत्वाचे योगदान दिले. दिल्लीकडून अक्षर पटेलने २, विप्रज निगमने २ आणि स्टार्कने ३ विकेट काढल्या.
प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाला फक्त १९० धावाच करता आल्या. दिल्लीकडून फाफने ६२, अक्षर पटेलने ४३ आणि विप्राज निगमने ३८ धावा केल्या. तर कोलकाताकडून सुनील नारायणने ३, वरुण चक्रवर्तीने २ विकेट घेतल्या.