२०२६ च्या Asian Games मध्ये क्रिकेटचे पुनरागमन, तर पहिल्यांदाच एमएमएचाही समावेश(फोटो-सोशल मिडिया)
Asian Games २०२५ : क्रिकेट जगतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे की, २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेट आणि मिश्र मार्शल आर्ट्सचा समावेश केला आहे. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमधील नागोया शहरात आयोजित करण्यात येतील. या स्पर्धा पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार आहेत.
ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या प्रेस मध्ये म्हटले आहे की, AINAGOC च्या संचालक मंडळाच्या ४१ व्या बैठकीत क्रिकेट आणि MMA चा अधिकृतपणे खेळांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक २८ एप्रिल रोजी जपानमधील नागोया सिटी हॉलमध्ये झाली.
प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, हे क्रिकेटचे आयोजन आयची शहरात होणार आहे. मात्र त्याचे स्थान अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. दक्षिण आशियातील क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये त्याचा समावेश यामुळे त्यात अधिक रस वाढला आहे. १९०० च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला होता. हे उल्लेखनीय आहे. ज्यामध्ये ग्रेट ब्रिटनने फ्रान्सचा १५८ धावांनी पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले होते. १२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला आहे.
यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत २०१०, २०१४ आणि २०२२ च्या वर्षात क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. २०२२ मध्ये, भारताने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पुरुष संघात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल असे अनेक स्टार खेळाडू खेळले होते, तर महिला संघाने श्रीलंकेला हरवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. तर बांगलादेशला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) ला प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. जे या खेळाच्या ओळख आणि वाढत्या लोकप्रियतेसाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे. भारतात एमएमए अधिकाधिक लोकप्रिय होत असून विशेषतः अंशुल जुबली आणि पूजा तोमर सारख्या भारतीय फायटरनी UFC (अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप) मध्ये प्रवेश केल्याने, देशातील अनेक तरुण फायटरना संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे देशातील तरुण या खेळाकडे वळू लागला आहे.