कुलदीप यादव आणि रिंकू सिंग(फोटो-सोशल मीडिया)
DC vs KKR : आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात केकेआरने डीसीचा दारुण पराभव केला. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर केकेआणे प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्ली केवळ १९० धावाच करू शकली. परिणामी डीसीचा पराभव झाला. या सामन्यानंतर एक वेगळाच प्रकार मैदनात बघायला मिळाला. कुलदीप यादव रिंकू सिंगच्या कानात थप्पड मारताना दिसून आला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
कुलदीप यादवने काही मजा करत असताना रिंकूला थप्पड मारली आहे. त्यानंतर रिंकूला चांगलाच राग आला. तोही रागाने पेटला होता. कुलदीपने एकदा नाही तर तब्बल दोनदा थप्पड मारली. झाल अस की, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संपल्यानंतर, सर्व खेळाडू लहान गटात आपापसात गप्पा मारत उभे होते. यादरम्यान कुलदीप यादव, रिंकू सिंग आणि अनुकुल रॉय बोलत असल्याचे दिसत होते. दरम्यान, रिंकू आणि कुलदीप थट्टा करत असल्याचे दिसते. पण कुलदीपने गमंत म्हणून रिंकूला थप्पड मारली. थप्पड मारल्यानंतर, रिंकू सिंग देखील राग याला आणि काहीतरी बोलत असल्याचे दिसला. कुलदीप यादवने आणखी एक थप्पड मारण्याचा प्रयत्न केला पण रिंकूने तत्काळ आपला चेहरा बाजूला केला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देताना दिसून येत आहेत. काही लोक याला गमंत म्हणून देखील बघत आहेत. तर, काही लोक या वर्तनासाठी कुलदीपला दोष देताना दिसून येत आहेत. कुलदीपने बळाचा वापर केल्यानंतर रिंकू रागाने लालबूंद झालेला दिसत आहे.
या घटनेने आयपीएलच्या पहिल्या हंगामात झालेल्या ‘स्लॅपगेट’ वादाची आठवण झाली. जेव्हा मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू हरभजन सिंगने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या कानात मारली होती. या घटनेनंतर श्रीशांतच्या डोळ्यात अश्रू आले होते, ते पाहून प्रेक्षक देखील अवाक झाले होते.
Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY
— irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025
तेव्हा या प्रकरणाची बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली होती आणि हरभजन सिंगवर ११ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हरभजनने नंतर कबूल केले की श्रीशांतला थप्पड मारणे ही त्याची चूक होती. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
काल झालेल्या आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा घरच्या मैदानावर पराभव केला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत कोलकात्याने २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्लीच्या संघाला १९० धावापर्यंतच मजल मारता आली. केकेआरकडून रघुवंशीने ४४ धावांची खेळी साकारली.