IPL 2025: No one asked in the IPL Auction, now entry through the back door; 'These' four players' luck has paid off...
IPL 2025 : आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन येथे पहिला सामना खेळावला जाणार आहे. या धामधुमीत सर्व फ्रँचायझी त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यात मग्न झाले आहेत आणि तर अनेक संघ आहेत जे त्यांच्या जखमी खेळाडूंच्या जागी इतर खेळाडूंना संधी देण्यात येत आहे.
आत्तापर्यंत चार खेळाडूंची नावे पुढे आली आहेत . आयपीएल लिलावात विकले न गेलेले असतानाही हे खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर पाचव्या खेळाडूचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे.
अफगाणिस्तान संघाचा खेळाडू मुजीब उर रहमान, ज्याला यावेळी आयपीएल लिलावात एकाही संघाने खरेदी केले नाही. त्याचा देशबांधव अल्लाह गझनफरच्या दुखापतीनंतर तो मुंबई इंडियन्सने त्याला 2 कोटी रुपयांच्या किंमतीला सामावून घेतले आहे. मुजीब याआधी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज संघाकडून देखील खेळला आहे.
हेही वाचा : नजर टाका आयपीएलच्या इतिहासातील दिग्गज कर्णधारांच्या खेळीवर, 14 सीझनचे श्रेष्ठ नायक
या खेळाडूला आयपीएल लिलावात कोणतीही किंमत लावली नाही. परंतु, या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने निवडलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला दुखापत झाल्यानंतर चेतन साकारियाला त्याच्या जागी संधी देण्यात आली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्स संघात 75 लाखांच्या मूळ किमतीत सहभागी झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॉर्बिन बॉशचे नशीब फळफळले आहे. दुखापतग्रस्त खेळाडू लिझार्ड विल्यम्सच्या जागी या अष्टपैलूचे संघात समावेश करण्यात आला आहे. लिलावात कार्बाइनची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नव्हते. मात्र, आता तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
सनरायझर्स हैदराबादमधील इंग्लंडचा ब्रेडन कार्सला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी हैदराबाद संघाने वियान मुल्डरला 75 लाख रुपये किंमत असलेल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. जेव्हा हा खेळाडू लिलावाचा भाग होता तेव्हा त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता.
हेही वाचा : IPL 2025 Live Streaming : चाहत्यांसाठी सामने पाहण्यासाठी मोजावी लागणार किंमत, फॅन्स आयपीएलचा मोफत आनंद घेऊ शकणार नाहीत
अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला देखील आयपीएलच्या 18 व्या हंगामात कुणी खरेदी केले नव्हते. त्यामुळे तो या हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र अलीकडेच तो लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीत मैदानावर घाम गाळताना दिसून आला आहे. मात्र, तो कोणाची जागा घेणार की अन्य काही कारणासाठी संघाशी संबंधित आहे, याबाबत काही स्पष्ट झालेले नाही.