फोटो सौजन्य - सोशल मीडिया
निहार रंजन सक्सेना। नवराष्ट्र : आयपीएलमध्ये, कर्णधार त्यांच्या संघाच्या विजयी यशाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ धोरणात्मक निर्णयांद्वारेच नाही तर फलंदाजीतील त्यांच्या योगदानाने देखील गेल्या काही वर्षात अनेक महान खेळाडू केवळ त्यांच्या कर्णधारपदासाठीच नव्हे तर फलंदाजीने सामनाजिंकून देणाऱ्या कामगिरीसाठीही उदयास आले आहेत. या यादीत विराट कोहली सर्वात पुढे आहे. त्यानंतर एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी ५ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. रोहितने कर्णधार म्हणून ८८ विजयी सामन्यांमध्ये २,५६९ धावा केल्या आहेत. डाव हाताळण्याची आणि खेळ पूर्ण करण्याची त्याची क्षमता त्याला एक अद्वितीय दर्जा देते.
२०११ ते २०२१ पर्यंत आरसीबीचा सर्वात जास्त काळ कर्णधार राहिलेला कोहलीने कर्णधार म्हणून ६८ विजयी सामन्यांमध्ये २,७५६ धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.
आक्रमक आणि निर्भय डेव्हिड वॉर्नरने २०१६ मध्ये परदेशी कर्णधार म्हणून एसआरएचला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवून दिले. वॉर्नरने कर्णधार म्हणून एसआरएच आणि डीसीसाठी ४० विजयी सामन्यांमध्ये १,९३५ धावा केल्या आहेत.
केएल राहुल हा आयपीएलमधील सर्वांत सातत्यपूर्ण आणि स्टायलिश फलंदाजांपैकी एक आहे. पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून राहुलने ३२ विजयी सामन्यांमध्ये १,६०३ धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यरने २०२० मध्ये डीसीला त्यांच्या पहिल्या अंतिम फेरीत नेले आणि त्यानंतर २०२४ मध्ये केकेआरला तिसरे आयपीएल जेतेपद मिळवून दिले, अय्यरने कर्णधार म्हणून ४० विजयी सामन्यांमध्ये १,१६१ धावा केल्या आहेत.
एमएस धोनीने सीएसकेला ५ आयपीएल जेतेपदे आणि १० फायनल जिंकून दिल्या आहेत. दबावातही शांत राहणारा एक उत्कृष्ट फिनिशर, धोनीने सीएसके कर्णधार म्हणून ११० विजयी सामन्यांमध्ये २,७२२ धावा केल्या आहेत.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये दोन आयपीएल जेतेपदे जिंकली. त्याने केकेआर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) साठी ७१ विजयी सामन्यांमध्ये २.३७४ धावा केल्या आहेत
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात वीरेंद्र सेहवागने चांगलीच धुमाकूळ घातला होता. त्याने डीडी (आता दिल्ली कॅपिटल्स) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) संघाचे कर्णधार म्हणून २९ विजयी सामन्यांमध्ये १,११४ धावा केल्या आहेत.
महान सचिन तेंडुलकरने तीन हंगाम मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले
आणि फलंदाजीने एक आदर्श निर्माण केला. एमआय फ्रँचायझीचा कर्णचार म्हणून त्याने ३० विजयी सामन्यांमध्ये १,०८० धावा केल्या आहेत.
२००९ मध्ये गिलख्रिस्टने डेक्कन वार्जर्सला पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्वही केले आणि कर्णधार म्हणून ३५ विजयी सामन्यांमध्ये १,०४७ धावा केल्या.