फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
PBKS vs GT : मंगळवारी २५ मार्च रोजी आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला मोठा झटका बसला. हा झटका असा होता की अय्यरचे पहिले आयपीएल शतक फक्त तीन धावांनी हुकले. अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने ४२ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या . त्याने ५ चौकार आणि ९ षटकार मारले. श्रेयसच्या झंझावाती खेळीमुळे पंजाबने २४३/५ धावा केल्या आणि रोमांचक सामना ११ धावांनी जिंकला. पहिल्यांदाच पंजाबकडून खेळणाऱ्या श्रेयसला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. १८ व्या हंगामातील पंजाबचा हा पहिलाच सामना होता. पीबीकेएसची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला श्रेयसने शतक हुकवल्याबद्दल तिचे मत सोशल मीडियावर शेअर केले आहे.
कर्णधाराचे कौतुक करताना अभिनेत्री म्हणाली की, ९७ धावांचा डाव शतकापेक्षा चांगला असतो. बुधवारी सोशल मीडियावर पीबीकेएसच्या विजयाचा व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने लिहिले की, “स्पर्धेची सुरुवात चांगली झाली. ९७ धावांची खेळी शतकापेक्षा चांगली आहे. श्रेयसला सलाम ज्याने उत्तम दर्जा, नेतृत्व आणि आक्रमकता दाखवली. संघाने एक युनिट म्हणून खेळण्याची पद्धत मला खूप आवडली.” पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इतर खेळाडूंचेही तिने कौतुक केले. प्रीतीने लिहिले की, “विजयकुमार वैशाख, प्रियांश आर्य, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग यांचे खूप खूप अभिनंदन.” शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतरही श्रेयसला शेवटच्या षटकात स्ट्राईक मिळाला नाही.
IPL 2025 च्या हिंदी कॉमेंट्रीवर प्रेक्षकांनी केले प्रश्न उपस्थित, हरभजन सिंगने दिले सडेतोड उत्तर
शशांकच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याचे शतक हुकले. मोहम्मद सिराजने टाकलेल्या २० व्या षटकात शशांकने पाच चौकार मारले. त्याने १६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. जीटी विरुद्ध पीबीकेएस सामन्यानंतर श्रेयस म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी खूप आनंदी आहे. पहिल्या सामन्यात ९७ धावा करणे ही नेहमीच केकवरील आयसिंग असते. यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही.” शशांकने खुलासा केला की कर्णधार श्रेयसनेच त्याला शतकाची पर्वा न करता मोठे शॉट्स खेळण्याचा सल्ला दिला होता.
𝙏𝙝𝙖𝙩’𝙨 𝙝𝙤𝙬 𝙮𝙤𝙪 𝙡𝙚𝙖𝙙 𝙛𝙧𝙤𝙢 𝙩𝙝𝙚 𝙛𝙧𝙤𝙣𝙩 🫡
A perfect start as #PBKS skipper for Shreyas Iyer to guide his team to a splendid win! ❤️
Scorecard ▶ https://t.co/PYWUriwSzY#TATAIPL | #GTvPBKS | @PunjabKingsIPL | @ShreyasIyer15 pic.twitter.com/LdjeEOOAfb
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
पंजाबच्या विजयानंतर शशांकने पत्रकारांना सांगितले की, “खरं सांगायचं तर मी स्कोअरबोर्डकडे पाहिले नाही. पण पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यानंतर मी स्कोअरबोर्डकडे पाहिले आणि श्रेयस ९७ धावांवर होता. मी काहीही बोललो नाही. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, शशांक, माझ्या शतकाची काळजी करू नको. अर्थात मी त्याला विचारणार होतो की मी एक धाव घेऊन त्याला स्ट्राइक द्यावा का. शशांक म्हणाला, “हे सांगण्यासाठी खूप मन आणि धाडस लागते कारण टी-२० मध्ये शतके सहज करता येत नाहीत, विशेषतः आयपीएलमध्ये.”