फोटो सौजन्य - सोशल मीडिया
IPL 2025 Hindi Commentary : मागील काही वर्षांपासून जगामधील सर्वात मोठे लीग म्हणून ओळखले जाणार इंडियन प्रीमियर लीग जगभरामध्ये पहिले जाते त्यामुळे त्यांचे वेगवेगळे भाषेमध्ये दाखवले जाते. हिंदी आणि इंग्लिश यामध्ये असेलेल्या कॉमेंटेटरच्या यादीमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा त्याचबरोबर समालोचकांचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा आयपीएल २०२५ मध्ये हिंदी समालोचन पॅनेलचा भाग आहे आणि तो आजकाल खूप चर्चेचा विषय देखील आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान, भज्जीने जोफ्रा आर्चरच्या रंगाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता.
आता हिंदी भाष्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर हरभजन सिंहला त्याने केलेल्या टिपणीवर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले आहे. आता हरभजन सिंगने एका प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर एका वापरकर्त्याचा हिंदी भाषेत भाष्य करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वापरकर्त्याने आपली निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, “एकेकाळी हिंदी भाष्य माहितीने भरलेले असायचे, पण आता ते अधिक विनोदी आणि काव्यात्मक झाले आहे.” त्या वापरकर्त्याने म्हटले, “मी असे म्हणत नाही की कोणताही समालोचक चुकीचा आहे. तुम्ही सर्वजण दिग्गज आहात आणि आमच्यापेक्षा क्रिकेटबद्दल जास्त माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हिंदी समालोचनाच्या वेळी काहीतरी सांगा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला क्रिकेटबद्दल काहीतरी शिकता येईल.”
आता हरभजन सिंगने युजरच्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ पुन्हा शेअर करताना भज्जीने लिहिले, “तुमच्या सूचनांबद्दल धन्यवाद. आम्ही त्यावर काम करू.”
Thank you for the input . We will work on it 🙏🎙️ https://t.co/tk4m2km6Ga
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 25, 2025
आज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा सामना गुवाहाटी येथे संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. राजस्थानला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि कोलकाता नाईट रायडर्सना आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला.
आज केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल तर राजस्थानचे कर्णधारपद रियान पराग करणार आहे. दोन्ही संघाला पहिल्या सामन्यमध्ये विरोधी संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. आजच्या सामांन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ चांगल्या स्थितीमध्ये पॉईंट टेबलमध्ये उभा असेल.