IPL 2025: Chennai's money in the water! Got crores, but flopped in batting, 'these' four players of CSK will get coconuts..
IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने खेळून् झाले आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंगची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. ४९ व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला लागोपाठ दोनदा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. असे पहिल्यांदाच घडले आहे. यानंतर संघातील सर्व खेळाडू खूप निराश झाल्याचे दिसून आले आहेत.
तथापि, पंजाब किंग्जविरुद्ध, चेन्नईच्या फलंदाजांनी संघाची धावसंख्या १९० धावांपर्यंत पोहचवली. पण संपूर्ण स्पर्धेत चेन्नईच्या फलंदाजांकडून कर्णधार धोनीची निराशा करण्यात आली. आता असे मानले जात आहे की चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या काळात संघातील चार खेळाडूंना बाहेर ठेवण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर सीएसकेच्या चार खेळाडूंना बाहेर ठेवण्यात येणार आहे. सीएसकेने या खेळाडूंवर खूप पैसे मोजले आहेत. परंतु त्यांना अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात यश आले नाही. या यादीत राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, रचिन रवींद्र, विजय शंकर यांची नावे आघाडीवर आहेत. हे सर्व फलंदाज आयपीएल २०२५ मध्ये सुपरफ्लॉप ठरले आहेत.
दीपक हुड्डाबद्दल सांगायचे झाले तर त्याने चेन्नई साठी 6.20 च्या सरासरीने फक्त 22 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जला या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा होत्या. त्याच वेळी, किवी फलंदाज रचिन रवींद्रने चालू हंगामात चेन्नईसाठी खूप संथ गतीने फलंदाजी केली आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये १२८ च्या साध्या स्ट्राईक रेटने फक्त १९१ धावा केल्या.
हेही वाचा : MI vs RR : Suryakumar Yadav ची धमाकेदार कामगिरी! IPL च्या इतिहासात ठरला पहिलाच फलंदाज..
आयपीएल २०२५ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जकडून विजय शंकरवर विश्वास दाखवण्यात आला, परंतु तो त्यावर खरा उतरू शकला नाही. विजयशंकरने या हंगामात एकूण ६ सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून केवळ ११८ धावाच आल्या. त्याच वेळी, राहुल त्रिपाठीला या हंगामात चेन्नईसाठी एकूण ५ सामन्यांमध्ये फक्त ५५ धावाच करता आल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट फक्त ९६ बरहिला आहे तर सरासरी ११ राहिली आहे.