वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
MI vs RR : आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने उभे ठोकले होते. या सामन्यात राजस्थानकडून गुजरात टायटन्सला पराभूत व्हावे लागले होते. गुजरातच्या या पराभवाचे वैभव सूर्यवंशी कारण ठरला होता. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य गाठले होते. वैभवने फक्त ३५ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याने ७ चौकार आणि ११ षटकार लगावले होते. सूर्यवंशी आयपीएल मधील त्याच्या वयाने आधीच चर्चेत होता. शतक लगावल्यानंतर तो चर्चेत राहू लागला. काल झालेल्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशी खाते न उघडताच बाद झाला. अशातच, वैभवचे खरे वय १४ वर्ष नाही तर १६ वर्षे आहे. असा एक दावा करणरा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन व्यक्ति दिसून येत आहेत. प्रथम, ते व्हिडिओमध्ये सांगतात की, ‘ते समस्तीपूर, बिहारचे रहिवासी आहेत.’ तसेच नंतर ते व्हिडिओमध्ये आजूबाजूची ठिकाणे दाखवायला लागतात. मग त्यातील एक सांगतो की, ‘वैभव सूर्यवंशी त्याच्यासोबत खेळायचा, तो त्याला गोलंदाजी करून सराव करायला लावत असे.’
तसेच तो व्यक्ती म्हणाला, ‘सर्वात अवघड काम त्याचे नाही तर त्याच्या वडिलांचे आहे. ते आम्हाला दररोज पाटण्याला घेऊन जायचे, आमंत्रित करायचे, पार्ट्या करायच्या, आम्ही वैभवसमोर गोलंदाजी करून त्याचा सराव करून घ्यायचो.’
तो व्यक्ती पुढे सांगतो की, तो(वैभव) टुक-टुक खेळणारा माणूस नसून तो जिथे जिथे खेळला आहे तिथे त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आहे. यानंतर, तो म्हणतो की बिहारमधील एक मुलगा स्वतःसाठी नाव कमवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, पण त्याचे वय १४ वर्षे दाखवले जात आहे. याचे त्याला दुःख आहे. त्याचे खरे वय सांगण्यात आले असते, तर आम्हाला नक्कीच मजा आली असती. त्याचे खरे वय १६ वर्षे आहे.
हेही वाचा : MI vs RR : Suryakumar Yadav ची धमाकेदार कामगिरी! IPL च्या इतिहासात ठरला पहिलाच फलंदाज..
अधिक माहिती अशी की, वैभव सूर्यवंशी यांची एक मुलाखत देखील व्हायरल झाली आहे, जी २०२३ मधील असून त्यात तो सप्टेंबरमध्ये १४ वर्षांचा होईल असे म्हणत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक त्याच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे.