Get ready! The IPL 2026 bugle has sounded! Teams will have to submit their retention lists; Auction to be held on 'this' date
IPL 2026 auction likely to take place around December 15 : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता आयपीएल २०२६ चे बिगुल वाजला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव १३ आणि १५ डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे रिटेन्शन खेळाडू सोडावे लागणार आहे.
हेही वाचा : सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर
क्रिकबझच्या अहवालानुसार, आयपीएलच्या सर्व १० संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीझची माहिती असणार आहे. अहवालात असे देखील म्हटले आहे की बीसीसीआय अधिकाऱ्यांशी बोललेल्या फ्रँचायझींकडून असे सूचित करण्यात आले आहे की, आयपीएल २०२६ चा लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. तथापि, लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलने अद्याप वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले नाही.
यावेळी मिनी लिलावात मोठ्या बदल होण्याचे संकेत नाहीत. तर देखील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांची, ज्यांनी आयपीएल 2026 च्या हंगामात या दोन्ही संघांची कामगिरी सुमार राहिली आहे. ही संघ तळाशी राहिले होते. त्यामुळे ही दोन संघ काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि डेव्हॉन कॉनवे (सीएसके) सारख्या खेळाडूंची नावे रिटेन्शन लिस्टमधून वगळली जाऊ शकतात. आर. अश्विनच्या निवृत्तीमुळे सीएसकेच्या खिशात आणखी एकाची वाढ झाली आहे. अश्विनच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे सीएसकेच्या खिशात ₹९.७५ कोटींची भर पडली आहे.
तसेच राजस्थान रॉयल्सबाबत सांगायच झालं तर, सर्वात मोठा प्रश्न कर्णधार संजू सॅमसनबद्दल उपस्थित होत आहे. जर हा व्यवहार यशस्वी झाला तर संघ त्याला देखील सोडण्याची शक्यता आहे. तसेच या संघाबबत पूर्वी, अशी चर्चा होती की संघ त्यांचे दोन श्रीलंकेचे फिरकीपटू, हसरंगा आणि थीकशनालाही सोडू शकतो, परंतु आता कुमार संगकारा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने, यामुळे निर्णय बदलण्याची शक्यता आहे.
टी नटराजन, आकाश दीप, मिचेल स्टार्क, मयंक यादव आणि डेव्हिड मिलर यासारख्या खेळाडूंचे भविष्य देखील आता अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे. केकेआरने शेवटचे ₹२३.७५ कोटींना खरेदी केलेल्या व्यंकटेश अय्यर या खेळाडूला रिटेनमेंट कसे करायचे हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सर्व आयपीएल फ्रँचायझी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनकडे लक्ष्य लावून आहेत. दुखापतीमुळे तो गेल्या लिलावात सहभागी होऊ शकला नव्हता, परंतु यावेळी तो सर्वात मोठ्या नावांपैकी एक असणार आहे.