
मुकुल चौधरीच्या नावे रचला गेला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या सामना जिंकवून देणाऱ्या खेळीमुळे मुकुलने एक असा IPL विक्रमही रचला आहे, जो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांच्याही नावावर नाही. आयपीएलमध्ये यशस्वी धाव-पाठलाग करताना शेवटच्या ५ षटकांत ५० धावा करणारा मुकुल पहिला भारतीय खेळाडू ठरला. डावाच्या १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदनंतर मुकुल फलंदाजीसाठी आला. त्यानंतर, १५ व्या षटकाच्या अखेरपर्यंत तो केवळ २ चेंडूंमध्ये १ धाव काढू शकला. पुढील ८ चेंडूंमध्ये मुकुलच्या खात्यात फक्त २ धावा होत्या, पण त्यानंतर त्याने जे केले त्यामुळे नवा इतिहास रचला गेलाय.
मुकुलच्या नावे झाला रेकॉर्ड
मुकुलने एबी डिव्हिलियर्स आणि पोलार्ड यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. यशस्वी आयपीएल धाव-पाठलागाच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये ५० धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्स आणि कायरोन पोलार्ड यांच्या पंक्तीत मुकुल सामील झाला आहे. कायरोन पोलार्डने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. या सामन्यात पोलार्डने शेवटच्या २१ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या होत्या. २०१४ मध्ये डिव्हिलियर्सनेही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या २२ चेंडूंमध्ये ५६ धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आता, मुकुल चौधरीनेही यशस्वी धाव-पाठलागात हा पराक्रम केला आहे.
लखनौला शेवटच्या षटकात १४ धावांची गरज होती
ईडन गार्डन्सवर, केकेआरने लखनौला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा बचाव करताना, केकेआरच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले, पण शेवटच्या दोन षटकांमध्ये बाजी पलटली. असे असूनही, KKR ने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण २० व्या षटकात १४ धावा वाचवू शकले नाहीत.
अखेरीस, आवेश खानने षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि स्ट्राईक मुकुल चौधरीकडे सोपवली. त्यानंतर मुकुलने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला, पण तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याला धावा करता आल्या नाहीत. लखनौला दोन चेंडूंमध्ये ७ धावांची गरज होती. मुकुलने पुन्हा षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारून धावसंख्या बरोबर केली आणि मग शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन विजय निश्चित केला.
Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरच रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव