IPL Auction 2025 live Sam Curran Returns to CSK Amending Bowling order Including Batting Order
IPL Auction 2025 live Sam Curran Returns to CSK : आजच्या लिलावात अनेक मोठे आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. तर दुसरीकडे नवतरूण खेळाडूंवर मोठा पैसा ओतण्यात आला. करोडो रुपयांची खैरात नवतरुण खेळाडूंवर करण्यात आली. सॅम करनला पंजाबने रिलीज केल्यानंतर त्यांच्या जुन्या टीम सीएसकेने त्याला खरेदी केले.
सॅम करनचे चेन्नईमध्ये कमबॅक
55 कोटी रुपये खिशात घेऊन चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी बाहेर पडला. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी अश्विन, कॉनवे, रचिन रवींद्र या जुन्या खेळाडूंना जोडण्यात या संघाला यश आले. दुसऱ्या दिवशीही कथा काही वेगळी नव्हती. या संघाने दुसऱ्या दिवसाच्या लिलावात आपला आणखी एक जुना खेळाडू सॅम कुरन याला जोडले.
डेव्हीड कॉन्वे
डेव्हॉन कॉनवेला चेन्नईतून 6 कोटी 25 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली. गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेल्या राहुल त्रिपाठीलाही चेन्नई सुपर किंग्जने ३.२५ कोटींना विकत घेतले.
अश्विनचे पुनरागमन
रचिन रवींद्रलाही चेन्नई सुपर किंग्सने RTM कार्ड वापरून 4 कोटींना विकत घेतले. आर अश्विनही चेन्नई सुपर किंग्जचा भाग बनला आहे. हा खेळाडू 9 वर्षांनंतर चेन्नईला परतला आहे. चेन्नईने अश्विनला 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला चेन्नईने 4 कोटी 80 लाख रुपयांना विकत घेतले. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदला चेन्नईने सर्वाधिक 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
CSK ने 65 कोटींमध्ये 5 खेळाडू रिटेन केले
लिलावापूर्वी चेन्नई फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या 5 खेळाडूंमध्ये धोनी व्यतिरिक्त रवींद्र जडेजा, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड आणि मथिशा पाथिराना यांचा समावेश होता. आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक फ्रँचायझीकडे संघ तयार करण्यासाठी 120 कोटी रुपये आहेत. त्या 120 कोटींपैकी CSK ने 65 कोटी रुपये फक्त त्या 5 खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी खर्च केले आहेत.
लिलावात खेळाडू विकत घेतले
आर अश्विन- 9.75 कोटी
डेव्हॉन कॉन्वे- 6.25 कोटी
राहुल त्रिपाठी- 3.40 कोटी
रचिन रवींद्र- 4 कोटी
खलील अहमद – 4.80 कोटी
नूर अहमद – 10 कोटी
विजय शंकर- 1.2 कोटी
सॅम करन- 2.40 कोटी
शेख रसीद – 30 लाख
अंशुल कंबोज – 3.40 कोटी
मुकेश चौधरी – 30 लाख
दीपक हुडा- 1.70 कोटी
गुरजपनीत सिंग – २.२ कोटी
नॅथन एलिस- 2 कोटी
जेमी ओव्हरटन- 1.5 कोटी
कमलेश नगरकोटी-३० लाख
रामकृष्ण घोष – ३० लाख
आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्ज संघ
खेळाडू राखून ठेवले
ऋतुराज गायकवाड (18 कोटी)
रवींद्र जडेजा (१८ कोटी)
मथिशा पाथिराना (१३ कोटी)
शिवम दुबे (१२ कोटी)
एमएस धोनी (४ कोटी)