Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs  ITA, T20 World Cup 2026 : ईडन गार्डन्सवर इंग्लंडच बॉस! इटलीला 24 धावांनी धूळ चारत सुपर 8 मध्ये दिमाखात एंट्री 

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या २९ वा सामन्यात इंग्लंडने इटलीचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंड संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 07:59 PM
ENG vs ITA, T20 World Cup 2026: England dominate at Eden Gardens! Defeat Italy by 24 runs to enter Super 8

ENG vs ITA, T20 World Cup 2026: England dominate at Eden Gardens! Defeat Italy by 24 runs to enter Super 8

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs  ITA, T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने इटलीचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून इटलीसमोर २०३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रतिउत्तरात इटली संघ  २० षटकांत १७८ धावांवर गारद झाला.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup : PCB अध्यक्ष नक्वी यांचे स्थान धोक्यात? भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर असीम मुनीरचा राग अनावर

इंग्लंडच्या डावाची सुरुवात संथ

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडला तिसऱ्याच षटकात २१ धावांवर पहिला झटका बसला. जोस बटलर ३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर सलामीवीर फील साल्ट आणि जेकब बेथेल यांनी ३३ धावांची भागीदारी रचली, त्यानंतर फील साल्ट १५ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकब बेथेल, टॉम बॅंटन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेकब बेथेल २३ धवा करून बाद झाला तर टॉम बॅंटन ३० धावांवर माघारी गेला. कर्णधार हॅरी ब्रुक काही खास करू शकला नाही. तो १४ धावा करून बाद झाला. सॅम करनही २५ धावा करून माघारी गेला.त्यानंतर मात्र संघ चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत असताना मैदानात आलेल्या विल जॅक्सने मात्र इटलीच्या गोलंदाजीवर चांगलेच आक्रमण चढवत इंग्लंडचा डाव पुढे नेला. जेमी ओव्हरटन १५ धावांवर बाद झाला, विल जॅक्सने आपले अर्धशतक पूर्ण करून संघाला देखील २०२ पर्यंत पोहचवले. तो २२ चेंडूत ५३ धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. तसेच जोफ्रा आर्चर १ धाव काढून नाबाद राहिला. इटलीकडून ग्रँट स्टीवर्ट आणि क्रिशन कलुगामेज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जेजे स्मट्स, अली हसन आणि  बेन मॅनेंटी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

England fend off Italy’s fightback to clinch win in Kolkata at the #T20WorldCup 👊 📝: https://t.co/PBfNBwjiX1 pic.twitter.com/mS0SQMAijj — ICC (@ICC) February 16, 2026

 

इटलीची जोरदार टक्कर

इंग्लंडने दिलेल्या २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इटलीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने फक्त १ धावात दोन विकेट गमावल्या आणि २२ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी आपली तिसरी विकेट गमावली. इटली संघ चांगलाच अडचणीत आला असे वाटत असताना  जस्टिन मोस्का आणि बेन मेनेंटी यांनी चौथ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९२ धावांची शानदार भागीदारी रचली आणि संघाला सामन्यात परत आणले होते. बेन मेनेंटी यांनी २५ चेंडूत ६० धावांची आक्रमक खेळी केली. तर जस्टिन मोस्का यांनी २३ चेंडूत ४५ धावा फटकावल्या. परंतु, या दोघांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही.

हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

अंतिम सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी जबरदस्त ठरली

बेन मेनेंटी बाद झाल्यानंतर, इटलीचा डाव पुन्हा एकदा कोसळला आणि  संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला आणि इटलीला लक्ष्याच्या अंतरावर रोखले. इंग्लंडकडून सॅम करने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या विजयासह, इंग्लंडने (२०२६ च्या टी-२० विश्वचषका)सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले, तर या पराभवामुळे इटलीला मोठा धक्का बसला.

Web Title: Eng vs ita t20 world cup 2026 england enter super 8 by defeating italy by 24 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Harry Brook
  • Sam Curran

संबंधित बातम्या

ENG vs ITAT, T20 World Cup 2026 :इंग्लंडसाठी धावून आला विल जॅक्स! इटलीसमोर उभारला 203 धावांचा डोंगर 
1

ENG vs ITAT, T20 World Cup 2026 :इंग्लंडसाठी धावून आला विल जॅक्स! इटलीसमोर उभारला 203 धावांचा डोंगर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.