फोटो सौजन्य – X (ICC)
आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तानचा महिला संघ आयलँड दौऱ्यावर होता. यामध्ये आयर्लंडच्या महिला संघाने पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून मालिका नावावर केली आहे. या मालिकेमध्ये आयर्लंडच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. आयर्लंडच्या संघाने केलेल्या कामगिरीनंतर संपुर्ण जग चकित राहिले. आयर्लंड महिला संघाने पाकिस्तानला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात हरवले. बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत यजमानांना विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांच्या या पाठलागात आयर्लंडने जोरदार झुंज दिली, संघाला शेवटच्या चेंडूवर ४ धावांची आवश्यकता होती, त्यानंतर सादिया इक्बालने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिलाच, शिवाय मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडीही मिळवून दिली. आयर्लंडच्या संघाने पाकिस्तानला टी-२० मालिकेत पराभूत करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ मालिकांमध्ये आयर्लंडने तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आहे.
𝙏𝙝𝙚 𝙬𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙢𝙤𝙢𝙚𝙣𝙩 One ball left. Jane to the crease. Four to win? No problem… WATCH: https://t.co/fG3x5MlwTV
LIVE SCORE: https://t.co/xFRYL3ONZc
FAN GUIDE: https://t.co/klLspsdw5E#BackingGreen #FuelledByCerta ☘️🏏 pic.twitter.com/VW0DeU8Gg2 — Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) August 8, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. सर्व फलंदाजांनी संमिश्र योगदान दिले. शवाल झुल्फिकारने सर्वाधिक ३३ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात चांगली झाली नाही, यजमान संघाने ३५ धावांवर तीन विकेट गमावल्या.
ZIM vs NZ: न्यूझीलंडने वर्ल्ड रेकाॅर्ड केला नावावर! 3 किवी फलंदाजांनी केला चमत्कार
त्यानंतर, ओर्ला प्रेंडरगास्ट (५१) आणि लॉरा डेलानी (४२) यांनी चौथ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून संघाला विजयाचा मार्ग दाखवला. रेबेका स्टोकेलने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. या रोमांचक सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आयर्लंडला ४ धावांची आवश्यकता असताना, जेन मॅग्वायरने षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. महिला टी२० क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे.
या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध ओर्ला प्रेंडरगास्ट हिने कमालीची कामगिरी केली. तिने संघासाठी अर्धशतक झळकावले आणि तिच्या या कामगिरीने संघाला विजय मिळवुन देण्यात यश मिळाले.