
मेलबर्न : पाकिस्तानचा (Pakistan) संघ न्यूझीलंड (Newziland) सोबत सेमीफायनलचा सामना जिंकून टी २० विश्वचषक सामन्याच्या फायनल मध्ये पोहोचला आहे. तर भारतीय संघ मात्र इंग्लंड विरुद्ध सामना हारून विश्वचषकाबाहेर पडला आहे. पाकिस्तानचा संघ आता विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट संघाचे हे यश पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात डोक्यात गेले आहे. भारतीय संघ विश्वचषकाबाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डिवचण्यासाठी एक ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देत भारताचा क्रिकेटकर इरफान पठाणने फटकारलं आहे.
पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी “तर रविवारी आता 152/0 Vs 170/0 #T20WorldCup” असे ट्विट केले होते. याचा अर्थ असा पाकिस्तानने गेल्या वर्षी झालेल्या टी २० विश्वचषक २०२१ मध्ये भारताचे १५२ धावांचे आव्हान बिनबाद पार केले होते. यंदाच्या टी २० विश्वचषक २०२२ मध्ये इंग्लंडने सेमी फायनल सामन्यात भारताचे १६९ धावांचे आव्हान १६ षटकात बिनबाद पार करत अंतिम फेरी गाठली होती. याचाच आधार घेत शरीफ यांनी खोचक ट्विट केले.
So, this Sunday, it’s: 152/0 vs 170/0 ?? ?? #T20WorldCup — Shehbaz Sharif (@CMShehbaz) November 10, 2022
इरफान पठाणने पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या ट्विटला चोख प्रत्युत्तर देत त्यांना फटकारलं. इरफान पठाणने ट्विट केले की, ‘तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही तुमच्या आनंदात आनंदी मात्र तुम्ही यांच्या दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी. यामुळेच स्वतःच्या देशाला चांगल्या स्थितीत नेण्यावर लक्षच नाहीये.’