Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SMAT FINAL : इशान किशनचे 45 चेंडूत शतक! हरियाणाला पराभूत करत झारखंडने कोरले Syed Mushtaq Ali Trophy जेतेपदावर नाव 

पुण्यात खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे जेतेपदावर नाव कोरले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 09:01 PM
SMAT FINAL: Ishan Kishan's century in 45 balls! Jharkhand beat Haryana to win Syed Mushtaq Ali Trophy title

SMAT FINAL: Ishan Kishan's century in 45 balls! Jharkhand beat Haryana to win Syed Mushtaq Ali Trophy title

Follow Us
Close
Follow Us:

Jharkhand wins Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी झारखंड आणि हरियाणा या दोन संघात खेळला  गेला. पुण्यात खेळवण्यात आलेल्या जेतेपदाच्या लढतीत झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे पहिले जेतेपद पटकावले. नाणेफेक गमावणाऱ्या झारखंडने प्रथम फलंदाजी करत कर्णधार इशान किशनच्या वादळी शतकाच्या जोरावर ३ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ १८.३ षटकात १९३ धावा करून सर्वबाद झाला.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार

प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विराट सिंगच्या रूपाने पहिली विकेट् गमावली. त्यानंतर आलेल्या कुमार कुशाग्रसोबत सलामीवीर ईक्षण किशनने १७७ धावांची भागीदारी केली. कर्णधार इशान किशनने जबाबदारीने स्फोटक पारी खेळली. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने हरियाणाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इशान किशनने ४९ चेंडूत १०१ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि १० षटकार लगावले. त्यानंतर तो बाद झाला. त्याला सुमित कुमारने बाद केले. इशान नंतर कुमार कुशाग्राने देखील अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले.

कुमार कुशाग्रानंतर आलेल्या अनुकुल रॉयने देखील स्फोटक खेळी करत अवघ्या २० चेंडूत  नाबाद ४० धावा करून संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले. त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच रॉबिन मिन्झ देखील ३१ धावांवर नाबड राहिला. हरियाणाकडून सुमित कुमार, अंशुल कंबोज आणि सामंत जाखड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हरियाणाचा डाव

झारखंडने दिलेल्या डोंगरा इतक्या २६३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हरियाणाची सुरुवात खूपच खराब राहिली. त्यांनी ३६ धावांमध्ये आपले ३ महत्वाचे फलंदाज गमावले. अर्श रंगा १७,  कर्णधार  अंकित कुमार ०, आशिष सिवाच ० धावा करून बाद झाले. यांच्यानंतर आलेल्या  यशवर्धन दलाल आणि निशांत सिंधू यांनी ६७ धावांची भागीदारी केली. यशवर्धन दलाल २२ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला तर सिंधू ३१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सामंत जाखडने ३८ धावा करत  थोडा संघर्ष केला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पार्थ वत्स ४ धावा,  सुमित कुमार ५ धावा, अंशुल कंबोज ११ धावा, इशांत भारद्वाज १७ धावा करून बाद झाले तर अमित राणा १३ धावा करून नाबाद राहिला. झारखंडकडून सुशांत मिश्रा आणि बाळ कृष्ण यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर  विकास सिंग आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. परिणामी झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे जेतेपद पटकावले.

That winning feeling! 🥳 Time for celebration in the Jharkhand camp as they win the Syed Mushtaq Ali Trophy for the first time 🙌 Scorecard ▶️ https://t.co/3fGWDCTjoo#SMAT | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qJB0b2oS0Y — BCCI Domestic (@BCCIdomestic) December 18, 2025

हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

हरियाणा संघ :  अर्श रंगा, अंकित कुमार (सी), निशांत सिंधू,यशवर्धन दलाल (wk), सामंत जाखड, पार्थ वत्स, आशिष सिवाच, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अमित राणा, इशांत भारद्वाज

झारखंड : इशान किशन (c) (wk), विराट सिंग, कुमार कुशाग्र, रॉबिन मिन्झ, अनुकुल रॉय, पंकज कुमार,राजनदीप सिंग, बाळ कृष्ण, विकास सिंग, सुशांत मिश्रा, सौरभ शेखर

Web Title: Jharkhand won the syed mushtaq ali trophy after defeating haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:55 PM

Topics:  

  • Syed Mushtaq Ali Trophy 2025

संबंधित बातम्या

Syed Mushtaq Ali Trophy : बाप रे! टी-२० सामन्यात 432 धावा…! इशान किशनच्या संघाचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय 
1

Syed Mushtaq Ali Trophy : बाप रे! टी-२० सामन्यात 432 धावा…! इशान किशनच्या संघाचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.